AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैद्यकीय तज्ज्ञांनी 52 हजार तरूणांना दिले आरोग्याचे धडे, मुख्यमंत्री आरोग्य संवादला प्रतिसाद..

वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत आहेत. या सत्रांमध्ये वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांतील विद्यार्थी सहभागी होत आहेत.

वैद्यकीय तज्ज्ञांनी 52 हजार तरूणांना दिले आरोग्याचे धडे, मुख्यमंत्री आरोग्य संवादला प्रतिसाद..
Chief Minister
| Updated on: Oct 16, 2026 | 6:22 PM
Share

बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण यांमुळे तरुणांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज वाढली आहे. ही गरज लक्षात घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळावे, यासाठी नवरात्रोत्सव काळात राज्यात ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद, जागर आरोग्याचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत राज्यात आतापर्यंत ३९३ सत्रे झाली असून, ५२ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. तरुण वयातच आरोग्याची काळजी घेण्याच्या योग्य सवयी लागाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य आणि निरोगी जीवनशैली यांचे महत्त्व समजावे, तसेच आरोग्यविषयक प्रश्नांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे, यासाठी ही सत्रे आयोजित केली जात आहेत.

या उपक्रमांतर्गत विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत आहेत. या सत्रांमध्ये वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांतील विद्यार्थी सहभागी होत आहेत.

विभागनिहाय विद्यार्थ्यांचा सहभाग विभागनिहाय आकडेवारीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात १२२ सत्रे झाली असून, त्यात ११ हजार ९८० विद्यार्थी सहभागी झाले. मराठवाड्यात ९१ सत्रांत ९ हजार ८५४, नाशिक विभागात ९३ सत्रांत १० हजार ६३४, तर अमरावती विभागात ६२ सत्रांत ६ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कोकण विभागात ५३ सत्रांत ६ हजार ४०४ विद्यार्थी सहभागी झाले. मुंबई विभागात २४ सत्रे होऊन ३ हजार २६९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नागपूर विभागात ४५ सत्रे झाली असून, त्यात ३ हजार ८९३ विद्यार्थी सहभागी झाले.

या सत्रांमध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक आरोग्य, मोबाइल व सोशल मीडियाचा वापर, व्यसनमुक्ती आणि निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि दैनंदिन जीवनात कोणते बदल करावेत, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जात आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक होऊन ही माहिती कुटुंबीय आणि मित्रांपर्यंतही पोहोचवावी, हा या उपक्रमाचा हेतू आहे.

प्रतिक्रिया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा उपक्रम तरुणांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी महत्त्वाचा आहे. महाविद्यालयीन जीवनातच आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य आणि निरोगी जीवनशैली यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. तज्ज्ञांशी थेट संवाद साधल्यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक प्रश्न विचारता येतात आणि योग्य मार्गदर्शन मिळते. या माध्यमातून आरोग्याबाबत जागरूक पिढी घडण्यास मदत होईल. रामेश्वर नाईक कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?