मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महिलांना ‘भयमुक्त महाराष्ट्राची’ ओवाळणी देणार का? चित्रा वाघ यांचा सवाल
महाराष्ट्रातील महिलांना भाऊबीज सणानिमित्त भयमुक्त वातावरणाची ओवाळणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देणार का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. ( Chitra Wagh criticize Uddhav Thackeray and MVA Government on woman safety)

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील बी.एस्सीच्या अंतिम वर्षामध्ये शिकणाऱ्या तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचार आणि राज्यातील वाढलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, उस्मानाबादमध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या तरीही राज्य सरकार या घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला. ( Chitra Wagh criticize Uddhav Thackeray and MVA Government on woman safety)
महिला आणि मुलींवर दररोज अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. महिलांवर बलात्कार, विनयभंग होत आहे. सरकारमधील नेते हाथरसच्या घटनेचा निषेध करतात, महाराष्ट्रातील घटनांवर काहीही बोलत नाहीत, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
महिला सक्षमीकरणाच्या, सशक्तीकरणाच्या नावावर महिलांची दिशाभूल करण्याचं काम सरकार करतेय. महाराष्ट्रातील महिलांना भाऊबीज सणानिमित्त भयमुक्त वातावरणाची ओवाळणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देणार का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला.
माझे कुटुंब माझी जबाबदारी बोलून चालणार नाही
महाराष्ट्रात महिला साठी सुरक्षित नाहीत. महिला आयोगाला अध्यक्ष दिला जात नाही. दिशा कायदा महाराष्ट्रात लागू केला जात नाही. माझे कुटुंब माझे जबाबदारी बोलून चालणार नाही, त्यावर कृती करावी लागेल, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केले.
चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भयमुक्त दिवाळीची ओवाळणी आम्हा महिलांच्या झोळीत टाकणार आहात का? असा प्रश्न विचारला. राज्यात महिला आणि लहान मुलींवर दररोज अत्याचार होत आहेत. क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्य सरकारकडे कोविड सेंटरसाठी एसओपी बनवण्याची मागणी केली ती अजून पूर्ण केली नाही, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. ( Chitra Wagh criticize Uddhav Thackeray and MVA Government on woman safety)
दरम्यान, चित्रा वाघ यांनी बुधवारी यांनी जळगाव येथे महिला अत्याचारांवर घसा कोरडा होईपर्यंत बोंबा मारणारे महाआघाडीतील नेते गप्प का? असा प्रश्न विचारला होता. राज्यातील महिला सुरक्षेसंदर्भात ते इतके गप्प का झालेत ? असंही वाघ यांनी विचारले.
“जळगाव जिल्ह्यात रावेर येथे बालिकेवर अत्याचार करुन भावंडाच्या हत्याकांडाची घटना ताजी असताना पारोळा यथे एसी समाजाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करुन तिचा खून करण्यात आला”, राज्य सरकार महिला अत्याचाराच्या घटनांबद्दल गंभीर नाही, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.
महिला अत्याचारांच्या घटना वाढल्या, मुख्यमंत्र्याचे या घटनांकडे सोयीस्कर दुर्लक्ष, चित्रा वाघ यांचा आरोप@ChitraKWagh @OfficeofUT @BJP4Maharashtra @ShivSena https://t.co/8uW4wPQwnN
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 11, 2020
संबंधित बातम्या :
महिला अत्याचारांच्या घटना वाढल्या, मुख्यमंत्र्यांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष, चित्रा वाघ यांचा आरोप
( Chitra Wagh criticize Uddhav Thackeray and MVA Government on woman safety)
