निलंबनाची कारवाई करण्याची गरज काय? चित्रा वाघ, रुपाली चाकणकर रिल्स बनवणाऱ्या लेडी कंडक्टरच्या पाठीशी

वनिता कांबळे

|

Updated on: Oct 04, 2022 | 7:16 PM

मंगल गिरी यांनी इन्स्टाग्रामवर विविध गाण्यांवर रिल्स बनवले. याचे रिल्सचे व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले .

निलंबनाची कारवाई करण्याची गरज काय? चित्रा वाघ, रुपाली चाकणकर रिल्स बनवणाऱ्या लेडी कंडक्टरच्या पाठीशी

मुंबई : सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करणे एका लेडी कंडक्टरला चांगलेच महागात पडले आहे. एसटी महामंडळाची वर्दी घालून रिल्स बनवणाऱ्या महिला कंडक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रिल्समुळे मंगल गिरी या महिला वाहक आणि वाहतूक नियंत्रक कल्याण आत्माराम कुंभार या दोघांना बडतर्फ करण्यात आले. भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील(Rupali Thombre Patil ) या लेडी कंडक्टरच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. निलंबनाची कारवाई करण्याची गरज काय? असा प्रश्नच यांनी उपस्थित केला आहे.

मंगल गिरी यांनी इन्स्टाग्रामवर विविध गाण्यांवर रिल्स बनवले. याचे रिल्सचे व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले . त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. यावर आतापर्यंत आक्षेप नव्हता.

अलिकडेच त्यांनी एसटी महामंडळाची वर्दी घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावर त्यांनी एक व्हिडिओ बनवला. त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला.

या व्हिडिओमुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत मंडळाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यावर चित्रा वाघ, रुपाली चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लाखाहून जास्त फोलोअर्स असणार्या महिला कंडक्टरचा ST च्या विविध सुविधा जनतेपर्यंत पोहोचवण्यास उपयोग झाला असता. तसेच सध्या अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी FB/Twitter/Instagram व इतर समाजमाध्यमांचा वापर करतांना दिसताहेत मग हिच्यावरचं कारवाई करण्याचं कारण काय? असा प्रश्न उपस्थित करत याचं कारण स्पष्ट करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

तर, निलंबनाची कारवाई करण्याची गरज काय? असा सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केला आहे. मंगल यांना नोटीस देऊन समज द्यायला पाहिजे होती. निलंबनाच्या कारवाईची तक्रार मागे घ्यावी अन्यथा कारवाईचा इशारा देखील रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI