AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋतुजा लटके राजीनामा प्रकरण, चित्र वाघ यांनी आयुक्तांवरील दबावाचे आरोप फेटाळले, ठाकरे गटाच्या टीकेला सडेतोड उत्तर

सध्या ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. या वादावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ऋतुजा लटके राजीनामा प्रकरण, चित्र वाघ यांनी आयुक्तांवरील दबावाचे आरोप फेटाळले, ठाकरे गटाच्या टीकेला सडेतोड उत्तर
Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 13, 2022 | 3:39 PM
Share

मुंबई : सध्या ऋतुजा लटके (Rituja Latke) यांच्या राजीनाम्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळू नये यासाठी शिंदे, फडणवीस सरकारने महापालिका आयुक्तांवर दबाव आणल्याचा आरोप शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केला जात आहे. दुसरीकडे मात्र भाजपाने (BJP) हे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. लटके यांच्या राजीनाम्याबाबत महापालिका आयुक्तांवर कसलाही दबाव नसल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

आरोप फेटाळले

चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. लटके यांच्या राजीनाम्याबाबत महापालिका आयुक्तांवर कुठलाही दबाव नाही. याबाबत महापालिका आयुक्तांनी स्वत:च स्पष्ट केलं आहे. त्यांनी आपल्यावर कोणताही राजकीय दबाव नसल्याचं म्हटलं आहे. राजीनाम्याची जी तीस दिवसांची प्रक्रिया असते ती प्रक्रिया आयुक्त सध्या फॉलो करत असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटाचे नेमके आरोप काय?

ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळावी नाही यासाठी शिंदे सरकारने राजीनामा मंजूर न करण्यासाठी आयुक्तांवर दबाव टाकल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे. त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर घणाघात केला. लटके यांनी नियमानुसार तीन ऑक्टोबरलाच राजीनामा दिला होता. तसेच महापालिकेच्या संबंधित विभागाकडे नियमानुसार एका महिन्याचा पगार देखील जमा करण्यात आला होता. मात्र तरी देखील लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. परंतु  दुसरीकडे चित्रा वाघ यांनी हे आरोप फोटाळून लावले आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...