AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋतुजा लटकेंनी 3 ऑक्टोबरलाच राजीनामा दिला होता; पण शिंदे सरकारने…, ठाकरे गटाचा गंभीर आरोप

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. यावरून विनायक राऊत यांनी शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

ऋतुजा लटकेंनी 3 ऑक्टोबरलाच राजीनामा दिला होता; पण शिंदे सरकारने..., ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2022 | 2:59 PM
Share

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. दोन्ही गटाकडून एकोंमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेकडून (Shiv sena) ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र बीएमसीने त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही. याविरोधात लटके यांनी मुंबई हाय कोर्टात धाव घेतली आहे. आज लटके यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. मात्र ऋतुजा लटके यांना जर उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही तर पुढे काय? यासाठी ठाकरे गटाकडून प्लॅन बी देखील रेडी ठेवण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

नेमकं काय म्हटलं राऊत यांनी?

विनायक राऊत यांनी ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावरून शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ऋतुजा लटके यांनी नियमानुसार तीन ऑक्टोबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला. नियमानुसार एक महिन्याचा पगार देखील महापालिकेत जमा केला. मात्र ऋतुजा लटके यांना आम्ही उमेदवारी देऊ नये, यासाठी शिंदे सरकारकडून महापालिका आयुक्तांवर दबाव आणला गेला, मी याचा निषेध करतो असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

‘महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत’

दरम्यान काँग्रेसने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. याबाबत विनायक राऊत यांना विचारले असता. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन उमेदवाराला  पाठिंब दिला असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...