AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून आम्ही ठाकरे गटाच्या उमेदवाराला हजारोंच्या मताने जिंकून आणू; अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

सध्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे, फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.

...म्हणून आम्ही ठाकरे गटाच्या उमेदवाराला हजारोंच्या मताने जिंकून आणू; अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2022 | 1:53 PM
Share

मुंबई :  सध्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र बीएमसी (BMC) त्यांचा राजीनामा मंजूर करत नसल्याने चांगलाच वाद पेटला आहे. ऋतुजा लटके यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली असून, दोन्ही गटांकडून एकोमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता या प्रकरणावर काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ऋतुजा लटके यांना आम्ही पाठिंबा जाहीर केला आहे. हा निर्णय सोनिया गांधी यांचा आहे. देशात आणि राज्यात सध्या जी काही परिस्थिती आहे, त्याच्याशी एकत्र होऊन लढल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करू असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

शिंदे, फडणवीस सरकारला खोचक टोला

दरम्यान ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर बोलताना नाना पटोले यांनी शिंदे, फडणवीस सरकारला जोरदार टोला लगावला आहे. सध्या राज्यात ईडीचं सरकार आहे. हे ईडीचं सरकार घाबरट असून, जनतेसाठी नाही तर गुजरातसाठी काम करते. दिल्लीमध्ये जे त्यांचे दोन आका बसले आहेत, त्यांच्यासाठी काम करते असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

सरकार गुजरातसाठी काम करते?

पुढे बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की सध्याचं सरकार हे गुजरातसाठी काम करते म्हणून राज्यातील वेदातांसारखे प्रकल्प गुजरातला गेले. मुंबईत लोकलमध्ये अनेक सुधारणा करण्याची गरज आहे. मात्र या सरकारने आल्या-आल्याच मेट्रोच्या पॅकेजला मंजुरी दिली, कारण काय तर गुजरातचा फायदा झाला पाहिजे. यातून ऋतुजा लटके यांचा राजीनामा न घेण्यासाठी दबाव टाकला गेल्याची शक्यता असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....