VIDEO : बिर्याणीसाठी काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले

लखनौ : संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पक्षाच्या प्रचारासाठी नेते मंडळी आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. उत्तर प्रदेशच्या बिजनौर मतदारसंघातून काँग्रेसकडून नसीमुद्दीन सिद्दीकी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सिद्दीकी यांनी प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये बिर्याणी वाटपाचं आयोजन केलं. त्यानुसार, बिर्याणी वाटपाला सुरुवात करण्यात आली. मात्र, कुणाला पहिल्यांदा बिर्याणी मिळेल यासाठी काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना …

VIDEO : बिर्याणीसाठी काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले

लखनौ : संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पक्षाच्या प्रचारासाठी नेते मंडळी आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. उत्तर प्रदेशच्या बिजनौर मतदारसंघातून काँग्रेसकडून नसीमुद्दीन सिद्दीकी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सिद्दीकी यांनी प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये बिर्याणी वाटपाचं आयोजन केलं. त्यानुसार, बिर्याणी वाटपाला सुरुवात करण्यात आली. मात्र, कुणाला पहिल्यांदा बिर्याणी मिळेल यासाठी काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यामध्ये अनेक लोक जखमीही झाले.

प्रचारसभेनंतर दुपारच्या जेवणात बिर्याणी वाटप होणार होतं. पण, तिथे उपस्थित लोकांमध्ये पहिले बिर्याणी खाण्यावरुन वाद झाला. प्रत्येकजण त्याला पहिले बिर्याणी मिळावी यासाठी प्रयत्न करत होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. 

यानंतर आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी 34 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 9 लोकांना अटकही करण्यात आली. तसेच, गावात सुरक्षा वाढवण्यात आली असून अतिरिक्त सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात आलं आहे, अशी माहिती विभागीय अधिकारी राम मोहन शर्मा यांनी दिली.

काकरौली पोलीस ठाण्याअंतर्गत टंकहेडा गावात माजी खासदार मौलाना जमील यांच्या घरी या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. जमील यांनी नुकताच कांग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी ते बसपाचे खासदार होते. 2012 ला मीरापुर विधानसभेतून ते निवडूण आले होते. ही प्रचार सभा त्यांच्या घरी सुरु होती आणि तिथेच बिर्याणीवरुन हा राडा झाला. त्यामुळे जमील आणि त्यांच्या मुलाविरोधातही आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या 11 एप्रिलला बिजनौर येथे लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *