सत्तास्थापनेकडे मुख्यमंत्र्यांच्या लेकीचंही लक्ष, चिमुकलीचा आईला प्रश्न, अजून आपल्याला किती जागा हव्या?

शिवसेनेने फिप्टी-फिप्टीच्या फॉर्म्युल्याची आठवण करुन देत, मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. मात्र मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असं भाजप नेते म्हणत आहेत.

सत्तास्थापनेकडे मुख्यमंत्र्यांच्या लेकीचंही लक्ष, चिमुकलीचा आईला प्रश्न, अजून आपल्याला  किती जागा हव्या?
Follow us
| Updated on: Oct 28, 2019 | 4:19 PM

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तास्थापनेची आकडेमोड सुरु आहे. भाजपने 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे.

शिवसेनेने फिप्टी-फिप्टीच्या फॉर्म्युल्याची आठवण करुन देत, मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. मात्र मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असं भाजप नेते म्हणत आहेत.

एकीकडे ही सर्व आकडेमोड होत असताना, ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची 11 वर्षांची मुलगी दिविजाही (CM Daughter Divija ) या सर्व राजकारणाकडे बारीक लक्ष ठेवून आहे. दिविजा सध्या पाचवीत शिकत आहे. मात्र माध्यमात येत असलेल्या बातम्या, चर्चा, वादविवाद हे सर्व ती पाहात असते. मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीच याबाबतची माहिती दिली.

अमृता फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीवर त्यांच्या दिवाळीच्या आठवणी जागवल्या. यादरम्यान त्यांना घरच्या राजकीय वातावरणाकडे दिविजा कशी पाहते असं विचारण्यात आलं.

त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, “दिविजा खूपच समजुतदार मुलगी आहे. तिला निवडणुकीवेळी काय सुरु आहे, किती गडबडी सुरु आहेत हे सगळं कळतं. ती आता पाचवीत आहे. ती स्वत:ला अपडेट ठेवते. आम्हाला प्रश्न विचारते, न्यूजपेपर वाचते, ऑनलाईन वाचते”.

निकाल आल्यानंतर दिविजाने मला विचारलं की बहुमतासाठी किती जागा लागतील? कसं होईल, काय होईल, हे सगळं ती विचारते. नंबर्समध्ये तिला खूप इंटरेस्ट आहे, असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

याबाबत ती तिच्या बाबांशी कधी चर्चा करते का?

असा प्रश्न विचारला असता, अमृता फडणवीस म्हणाल्या, “एवढा वेळ मिळत नाही. पण कधी कधी विचारते ती बाबांना”. शिवाय लहान मुलांनी जर अडचणीचे प्रश्न विचारले तर त्यांना लहान होऊनच उत्तर द्यावं लागतं, अशीही पुष्टी त्यांनी जोडली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.