मॉडेलिंग हा केवळ….त्यानंतर मात्र…फडणवीसांवर मित्रांनीच केला होता प्रँक; काय घडलं होतं?

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी केलेलं मॉडेलिंग, लिहिलेल्या कविता, गाणी याबाबत दिलखुलासपणे सांगितलं.

मॉडेलिंग हा केवळ....त्यानंतर मात्र...फडणवीसांवर मित्रांनीच केला होता प्रँक; काय घडलं होतं?
devendra fadnavis
| Updated on: Jun 21, 2025 | 3:50 PM

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकूण 5 रेडिओ जॉकींनी मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी आपल्या तारूण्यातील अनेक आठवणी सांगितल्या. तसेच महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी मॉडेल म्हणून केलेलं काम, रचलेल्या कविता तसचे लिहिलेली गाणी याबाबतही फडणवीस यांनी सांगितलं. विशेष म्हणजे मॉडेलिंग करणं हा एक अपघात होता. माझ्या मित्रांनी माझ्यासोबत प्रँक केलं होतं, असी खास आठवण यावेळी फडणवीस यांनी सांगितली.

माझ्या मित्राने माझ्यासोबत हे प्रँक…

कॉलेजमध्ये असताना तुम्ही मॉडेलिंग केलं. तुम्हाला लिहिण्याची छंद आहे. तुम्ही गीतकार, कवीसुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा काय लिहिलं होतं? त्याबाबत काही आठवतं का? असा प्रश्न एका रेडिओ जॉकीने केला. या प्रश्नाचे फडणवीस यांनी मोकळेपणाने उत्तर दिले. सर्वप्रथम मॉडेलिंग हा एक केवळ अपघात होता. माझ्या मित्राने माझ्यासोबत हे प्रँक केलं होतं, अशी आठवण यावेळी फडणवीस यांनी सांगितली.

कुत्रा मणूष्याला चावला तर…

तसेच त्यावेळी हा प्रँक चालला. मी सुदैवाने त्यातून वाचलो. पण त्यानंतर मी मॉडेलिंग करण्याची कधीही हिंमत केली नाही. मी जे मॉडेलिंग केलं होतं ते त्यावेळी चांगलंच गाजलं, असंही फडणवीस म्हणाले. कुत्रा मणूष्याला चावला तर ती बातमी नसते. पण माणूस जर कुत्र्याला चावला तर ती बातमी होते. मांझ मॉडेलिंग म्हणजे माणसाचं कुत्र्याला चावणं होतं म्हणूनच ती बातमी झाली, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

मी काही कविताही केल्या, गाणीही लिहिली…

मला लिहिण्याची आधीपासूनच आवड होती. मी कॉलेजमध्ये असताना कविता लिहायचो. कविसंमेलनात जायचो. अगदी लहान असताना मी काही कविता लिहिल्या होत्या. एक आहे की कविता लिहिल्यानंतर त्या कधी साठवून ठेवल्या नाही. जेव्हा वाटलं तेव्हा लिहायचं आणि स्वत:च वाचायचो. आता मी नुकतेच दोन गाणे लिहिले आहेत. एक रामावर एक शंकरावर गाणं लिहिलं आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. तसेच एक गाण असं आहे जे मी लिहिलं आहे पण मी ते सांगणार नाही. तुम्ही शोधलं तर ते सापडेल, असी अक टास्कच देवेंद्र फडणववीस यांनी दिला.