Maharashtra Cabinet Expansion : विस्ताराआधी समजूत, इच्छुकांना समजावण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरणार?

Maharashtra Cabinet Expansion : सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे गटाच्या आमदारांची बैठक सुरू झाली आहे. स्वत: एकनाथ शिंदे हे या आमदारांची नाराजी दूर करत आहेत. कोर्टात केसेस सुरू आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार करणं शक्य नाही.

Maharashtra Cabinet Expansion : विस्ताराआधी समजूत, इच्छुकांना समजावण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरणार?
विस्ताराआधी समजूत, इच्छुकांना समजावण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 10:25 AM

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा थोड्याच वेळात विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion) अपक्षांना स्थान देण्यात येणार नाही. तसेच ज्या 16 आमदारांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे त्यांना या विस्तारात स्थान देण्यात येणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. ठाकरे सरकारमध्ये जे मंत्री होते त्यांनाच संधी दिली जाणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या सोबत बंड करून आलेल्या आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे शिंदे यांनी मंत्रिपद न मिळणाऱ्या आमदारांची (mla) नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे गटाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत शिंदे हे नाराजांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा तुम्हाला शब्द आहे. पुढच्या विस्तारात तुम्हाला संधी दिली जाईल. यावेळी प्रत्येकाला मंत्रीपद देणं शक्य नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगितलं जात आहे.

सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे गटाच्या आमदारांची बैठक सुरू झाली आहे. स्वत: एकनाथ शिंदे हे या आमदारांची नाराजी दूर करत आहेत. कोर्टात केसेस सुरू आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार करणं शक्य नाही. कोर्टाच्या निर्णयानंतरच पूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. राज्यात दोनच मंत्र्यांचं सरकार आहे. विरोधक टीका करत आहेत. राज्यात पूरपरिस्थिती आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्यामुळे लोकांमध्येही नाराजी पसरत चालली आहे. म्हणून मंत्रिमंडळाचा काही अंशी विस्तार करणं आवश्यक असल्याने तूर्तास काही आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. ज्यांचे नाव या विस्तारात येणार नाही. त्यांना पुढील काळात मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाईल, असं शिंदे यांच्याकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे आता शिंदे यांना आमदार कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

बच्चू कडू, संजय राठोड मंत्रीपदी नाहीच

अपक्ष आमदार बच्चू कडू आणि शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. पण या दोन्ही नेत्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार नाही. मंत्रिपद मिळणार नसल्याने बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली जाणार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.

या आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी

दीपक केसरकर तानाजी सावंत दादा भूसे संदीपान भूमरे गुलाबराव पाटील शंभूराज देसाई

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.