AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे, पाहा काय म्हणाले…

त्याचबरोबर आरोग्याची देखील आम्ही काळजी घेतोय, या राज्यातल्या माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, ही संकल्पना आरोग्य विभागाचे आमचे मंत्री तानाजी सावंत यांची टीम करते आहे.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे, पाहा काय म्हणाले...
cm eknath shindeImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 13, 2023 | 11:49 AM
Share

मुंबई : टीव्ही 9 (Tv9 Marathi)मराठीच्या वतीने आयोजित संकल्प महाराष्ट्राचा (Maharashtra), या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात मागच्या सहा-सात महिन्यात काय केले आणि पुढच्या काळात काय करणार आहे हे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे…

  1. आरोग्य केंद्र बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने 100 दवाखाने सुरु करण्यात आले आहेत. लोकांची गर्दी कमी करण्यासाठी एमआरआय मशीन सिटीस्कॅन मशीन डायलेसिस मशीनची संख्या वाढवावी असं असे आदेश देण्यात आले आहेत.
  2. मुंबई खड्डे मुक्त करणार, त्याचबरोबर मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करणार म्हणजे करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
  3. फडणवीसांच्या काळामध्ये जी काम सुरु झाली होती, ती काम अद्याप थांबलेली नाहीत. आम्ही सगळ्या प्रकल्प मधील स्पीडब्रेकर काढून टाकले आहेत. सगळे निर्णय घेतले शेवटी आमचा फोकस काय सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू म्हणून आम्ही काम करतोय
  4. दरवेळेला तुम्हीच खड्ड्यामध्ये खड्डे दाखवत होते 2000 खड्डे आहेत, अडीच हजार खड्डे आहेत, कमी झाले वाढले पूर्णपणे मुंबई खड्डे मुक्त पुढच्या दोन वर्षात झाली पाहिजे, यासाठी साडे 6 हजार कोटी रुपये आपण त्याच्यामध्ये खर्च केले आहेत.
  5. अनेक उपक्रम टीव्ही 9 च्या माध्यमातून फक्त बातम्या न राबविले जातात. कोरोना सारखा संकटात माध्यमातून फक्त बातम्या न देता, कोरोना सारखा संकट आलं, तर आगळावेगळा उपक्रम आपण हाती घेतला होता. याबद्दल मी मनापासून आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो.
  6. खरं म्हणजे आमचं सरकार सहा-सात महिने झाले हा कार्यकाळ पाहिला तर फार कमी आहे. परंतु या कमी वेळात देखील, आम्ही काय काम केले ते आपल्यासमोर आहे. त्यामध्ये प्रामुख्याने इन्फ्रा प्रोजेक्ट या राज्यामध्ये सुरू केले आहेत.
  7. 33 लाख झाड आम्ही लावतो तिथेचलॉजिस्टिक पार्क होतील,त्याचबरोबर फूड प्रोसेस इन युनिट होतील. शेतकऱ्यांच्या मालाला व्हॅल्यू ॲडिशन होईल त्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळतील
  8. कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, शेतकऱ्यांचं जे काही पीक पद्धती आहे त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. पारंपारिक शेती बरोबर सेंद्रिय शेती त्याला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. त्यासाठी आम्ही केवळ तीन ते चार महिन्यात 20 प्रकल्पना मान्यता दिली आहे. जवळपास अडीच ते पाच लाख हेक्टर जमीन त्यामुळे पाण्याखाली येईल.
  9. जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजींच्या सरकारमध्ये सुरू झाली, त्याचा आदर्श इतर राज्याने पण घेतला पण मागच्या अडीच वर्षांमध्ये त्या योजना बंद होत्या. आम्ही एकत्र आल्यापासून शेतीला पाणी आपल्याला कसं देता येईल यासाठी आम्ही सिंचनाचे प्रकल्पाला मान्यता देतोय
  10. त्याचबरोबर आरोग्याची देखील आम्ही काळजी घेतोय, या राज्यातल्या माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, ही संकल्पना आरोग्य विभागाचे आमचे मंत्री तानाजी सावंत यांची टीम करते आहे. मला आपल्याला या ठिकाणी सांगायला समाधान वाटेल की आपल्या कुटुंबातल्या ज्या स्त्रिया प्रमुख आहेत. त्यांना वेळ मिळत नाही, कुटुंबाचा सगळा व्याप त्याच्याकडे असतो. म्हणून चार कोटी 39 लाख महिलांची तपासणी केली.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच