AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमधील बस अपघाताला कोण जबाबदार? अपघातस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी

नाशिकचे पालकमंत्री, पोलीस, सर्व प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी, मुख्यमंत्र्यांची सगळ्यांची चर्चा

नाशिकमधील बस अपघाताला कोण जबाबदार? अपघातस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी
नाशिकमध्ये अपघातस्थळी मुख्मयंत्र्यांकडून पाहणीImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 08, 2022 | 1:21 PM
Share

चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक : नाशिकमध्ये झालेल्या बस अपघाताची (Nashik Bus Accident) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गंभीर दखल घेतली. ते स्वतः दुपारी 1 वाजता नाशिकमध्ये अपघातस्थळी दाखल झाले. अपघात झालेल्या ठिकाणी भेट देत त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातग्रस्त होऊन आगीत कोळसा झालेली बसची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी (Police) संवाद साधला. पोलिसांनी अपघातानंतर केलेल्या पंचनाम्यातून काय माहिती समोर आली आहे, हे त्यांनी जाणून घेतलं.

काही पोलीस अधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपघाताची माहिती देताना दिसून आले. दरम्यान, या अपघातानंतर करण्यात आलेल्या पाहणीवेळी पालकमंत्री दादा भुसे, आणि मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते.

स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्गासोबत एकनाथ शिंदे यांनी यावेळी अपघात झाले्लया ठिकाणाची पाहणी केली. अपघातानंतर बसला आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडली होती. या आगीत 12 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जातेय.

अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी प्रवाशांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी जखमी प्रवाशांची विचारपूस केली. स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णायलातही जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. जखमींना बरं करण्यासाठी कोणत्याही गोष्टींची कमतरता पडू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. डॉक्टरांच्या पथकासोबतही त्यांनी यावेळी संवाद साधला.

शनिवारी पहाटे पाच-साडे पाच वाजण्याच्या सुमारास खासगी लक्झरी बस आणि कोळशाने भरलेल्या ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेनंतर डिझेल टँक फुटून बसने पेट घेतला. यानंतर लागलेल्या आगीत अनेक प्रवासी होरपळले. त्यातील 12 प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले.

या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातलगांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचं म्हटलंय.

अपेक्षेपेक्षा जास्त प्रवाशी बसमध्ये असल्याचंही दिसून आलंय. त्यामुळे या बसवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. अपघातानंतर लागलेल्या आगीत ही बस पूर्णपणे जळून खाक झाली. राज्यातील रस्ते अपघातांचा प्रश्न या भीषण दुर्घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलाय.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.