ठाकरे सरकारचे खाते वाटप जाहीर, कोणत्या मंत्र्यांकडे कोणतं खातं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं (Maharashtra portfolio allocation) आहे.

ठाकरे सरकारचे खाते वाटप जाहीर, कोणत्या मंत्र्यांकडे कोणतं खातं?
Follow us
| Updated on: Dec 12, 2019 | 7:10 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं (Maharashtra portfolio allocation) आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. शिवसेनेकडे गृह आणि नगरविकास, राष्ट्रवादीकडे ग्रामविकास आणि जलसंपदा खातं, तर काँग्रेसकडे शिक्षण, महसूल आणि उर्जा मंत्रालय देण्यात आले (Maharashtra portfolio allocation) आहे. यात सर्वाधिक खाती ही शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आली आहेत. तर सर्वात कमी खाती ही काँग्रेस नेते बाळसाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आली (Maharashtra portfolio allocation) आहेत.

शिवसेना नेते सुभाष देसाई यांना 12 खाती मिळाली आहेत. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्याकडे 10 खाती देण्यात आली आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना 7 आणि छगन भुजबळ यांच्याकडे 6 खाती देण्यात आली आहेत. त्याशिवाय काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे 6, नितीन राऊत यांच्याकडे 8 खात्यांचा पदभार देण्यात आला (Maharashtra portfolio allocation) आहे.

  • शिवसेनेकडील महत्त्वाची खाती – मुख्यमंत्री, गृह, नगरविकास, उद्योग, कृषी, क्रीडा आणि परिवहन, सार्वजनिक बांधकाम
  • राष्ट्रवादीकडील महत्त्वाची खाती – अर्थ, गृहनिर्माण,राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य, ग्रामविकास, सहकार आणि जलसंपदा
  • काँग्रेसकडील महत्त्वाची खाती – महसूल, ऊर्जा, शालेय शिक्षण, महिला बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण

कोणाकडे किती खाते? 

शिवसेना

उद्धव ठाकरे – मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग.

एकनाथ शिंदे – गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण ही खाती असणार आहेत. यानुसार एकनाथ शिंदेकडे जवळपास 10 खाती असतील. 

सुभाष देसाई – उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास ही खाती देण्यात आली आहेत. सुभाष देसाईंकडे एकूण 11 खाती असणार आहेत. 

राष्ट्रवादी 

छगन भुजबळ – ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन ही खाती देण्यात आली आहे. म्हणजे छगन भुजबळ यांच्याकडे 6 खाती असणार आहेत.

जयंत पाटील – वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास ही खाती दिली आहेत. यानुसार जयंत पाटील यांच्याकडे 7 खाती असतील. 

काँग्रेस 

बाळासाहेब थोरात – महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय ही खाती दिली आहेत. यानुसार बाळासाहेब थोरात यांच्याकडे 6 खाती असतील. 

नितीन राऊत – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण ही खाती दिली आहेत. नितीन राऊत यांच्याकडे एकूण 6 खाती असतील. 

महाविकासआघाडीचा फॉर्म्युला?

सध्याच्या फॉर्म्युल्यावरुन शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आणि 22 अशी एकूण 23 खाती, काँग्रेसकडे 12 आणि राष्ट्रवादीकडे 13 खाती आहेत. राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद आल्यास त्यांच्या खात्यातही 14 मंत्रिपदे येऊ शकतात.

मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर?

दरम्यान, हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची माहिती आहे. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अनुत्सुक असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे अधिवेशनात महाविकासआघाडीचे केवळ सहा मंत्रीच दिसतील. 16 ते 21 डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यानंतर 23 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार (Thackeray Government Ministry) होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.