उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला, मंदिरे सुरु करण्याच्या भाजपच्या दबावाला पडले नाहीत: प्रताप सरनाईक

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंदिरे कधी उघडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. | Temples in Maharashtra

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला, मंदिरे सुरु करण्याच्या भाजपच्या दबावाला पडले नाहीत: प्रताप सरनाईक
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 4:01 PM

मुंबई: कोरोनाचा धोका असतानाही राज्यातील मंदिरे सुरु करण्यासाठी भाजपकडून मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणला जात होता. मात्र, या दबावाला उद्धव ठाकरे बळी पडले नाहीत. वेळ आल्यावर टप्याटप्याने मी सर्वकाही सुरु करेन, हा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळला. याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने उद्धव ठाकरे यांचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. (Temples in Maharashtra will be open from Diwali Padwa 2020 announcement by CM Uddhav Thackeray)

भाजपकडून सातत्याने सरकारवर दबाव आणला जात होता. पण उद्धव ठाकरे यांनी ‘जनता हाच माझा ठेव, हाच माझा विठ्ठल’, हे ब्रीद पाळून त्यांचे रक्षण केले. परिस्थिती पाहून टप्याटप्प्याने सर्व गोष्टी सुरु करेन, हे उद्धव ठाकरे यांनी अगोदरच सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी जिम, हॉटेल आणि रेस्टॉरंट टप्प्याटप्याने सुरु केली. आता लोकल ट्रेन सुरु करण्याचीही परवानगी राज्य सरकारने मागितली आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे खुली करण्यात येत असल्याची घोषणा केली. मंदिरं सुरू करण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहनही केलं आहे. मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असे त्यांनी नागरिकांना सांगितले.

इगोपोटी निर्णय रखडवला, मंदिरं उघडणे म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण : प्रवीण दरेकर ठाकरे सरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय इगोपोटी रखडवला असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. सरकारनं हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. मात्र केवळ भाजप आंदोलकांना, पुजाऱ्यांना वारकऱ्यांना सपोर्ट करते, मग अहंकारातून त्यांना मदत करायची नाही, इगोपोटी हा निर्णय रखडवला होता, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली.

संबंधित बातम्या:

ही ‘श्रींची इच्छा! पाडव्यापासून मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत; मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट!

(Temples in Maharashtra will be open from Diwali Padwa 2020 announcement by CM Uddhav Thackeray)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.