विरोधक होतो हा इतिहास बुजवा; नवी नांदी निर्माण करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मागच्या सरकारच्या काळात पूर्ण झालेले सामंजस्य करार हे 60 ते 70 टक्के पूर्ण झाले आहेत," असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. (CM Uddhav Thackeray Speech in Aurangabad)

विरोधक होतो हा इतिहास बुजवा; नवी नांदी निर्माण करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद : “राज्यात तीन पक्ष मिळून पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही निवडणूक एक दिलाने आणि मोठ्या जोमाने लढवूया. आपण विरोधक होतो हा इतिहास बुजवण्यासाठी आणि नवी नांदी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूयात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी  आज दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे भाष्य केले. (CM Uddhav Thackeray Speech Graduate and Teacher Constituency of Legislative Council in Aurangabad)

“राज्यात तीन पक्ष मिळून पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवत आहोत. ही निवडणूक एक दिलाने आणि मोठ्या जोमाने लढवूया. मला निवडणुकीचा कसलाही अनुभव नाही तरी सुद्धा मी मुख्यमंत्री झालो आहे. अशा अनुभवी मुख्यमंत्र्याला तुम्ही साथ देत आहात,” असे सांगत उद्धव ठाकरेंनी जनतेचे आभार मानले.

“महाविकासआघाडीचे सरकार संवेदनशील आहे. जनतेसाठी काम करणारं सरकार आहे. कोविड काळात आपण 50 हजार कोटींचे सामंजस्य करार केलेले आहेत. हे करार कागदावर नाहीत, तर ते पूर्ण होत आहेत. मागच्या सरकारच्या काळात पूर्ण झालेले सामंजस्य करार हे 60 ते 70 टक्के पूर्ण झाले आहेत,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. (CM Uddhav Thackeray Speech Graduate and Teacher Constituency of Legislative Council in Aurangabad)

“औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांना मतदार निवडून देतील. या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे की मन लावून काम करा. शिवसैनिक जोमाने काम करतील आणि आपला विजय होईल, अशी मला खात्री आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“तीन पक्ष मिळून आपण ही निवडणूक पहिल्यांदाच लढवत आहोत. त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपण विरोधक होतो हा इतिहास बुजवण्यासाठी आणि नवी नांदी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूयात,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

विधानपरिषद पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराचा सुपरसंडे

दरम्यान विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यासह अनेक दिग्गज नेते मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आज प्रत्येक ठिकाणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज प्रचार करणार आहे. उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातील मतदारसंघासाठी प्रचार केला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांच्यासाठी उद्धव ठाकरे झूमद्वारे प्रचारात सहभागी झाले. (CM Uddhav Thackeray Speech Graduate and Teacher Constituency of Legislative Council in Aurangabad)

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद, काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, सोमवारी ‘शॉक’साठी तयार राहा; मनसेची माहीम, दादरमध्ये खोचक होर्डिंगबाजी

(CM Uddhav Thackeray Speech Graduate and Teacher Constituency of Legislative Council in Aurangabad)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *