AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Co-operative Societie Election : परभवाच्या भीतीने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या? नव्या सरकारच्या निर्णयामागचं नेमकं कारण काय?

नव्या सरकारकडून जुन्या सरकारच्या अनेक निर्णयाला स्थगिती देण्यासोबतच काही नवीन निर्णय देखील घेतले जात आहेत. राज्य सरकारच्या सहकार विभागाने आता सहकारी संस्थांच्या (Co-operative Societie) निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.

Co-operative Societie Election : परभवाच्या भीतीने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या? नव्या सरकारच्या निर्णयामागचं नेमकं कारण काय?
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
| Updated on: Jul 16, 2022 | 9:14 AM
Share

मुंबई : महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात शिंदे, भाजप (BJP) यांचे सरकार आले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अद्याप या सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार बाकी आहे. मात्र या सरकारकडून निर्णयाचा धडाक सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. जुन्या सरकारच्या अनेक निर्णयाला स्थगिती देण्यासोबतच काही नवीन निर्णय देखील घेतले जात आहेत. राज्य सरकारच्या सहकार विभागाने आता सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. अतिवृष्टीचे कारण देत निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पराभव समोर दिसत असल्यानेच भाजपाने निवडणुका पुढे ढकल्याची टीका होत आहे.

7 हजारांहून अधिक संस्थांच्या निवडणुका लांबल्या

सहकार विभागाच्या या निर्णयामुळे ज्या संस्थांचा कार्यकाळ संपला होता, अशा नामनिर्देशन सुरू झालेल्या व कार्यकाळ संपला आहे मात्र नामनिर्देश सुरू न झालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात सहकारी संस्थांची एकूण संख्या 32 हजार 743 इतकी आहे. त्यापैकी 7620 सहकारी संस्थांनी निवडणुकांची तयारी सुरू केली होती. मात्र आता राज्य सहकार विभागाच्या या निर्णयामुळे या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. सहकारी संस्थांचे जाळे हे ग्रामीण भागात पसरलेले आहे. सध्या राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात परिस्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे अशा स्थितीत निवडणुका घेता येणे शक्य नसल्याचे सहकार विभागाने म्हटले आहे.

पराभव दिसत असल्याने निवडणुका पुढे ढकलल्या

दरम्यान यावरून आता विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. अनेक सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे. अशा स्थितीमध्ये निवडणुका पुढे ढकलने हे लोकशाही विरोधी असल्याची टीका शेतकरी नेते अजित नवले यांनी केली आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच