मुख्यमंत्र्यांबाबत नको ते शब्द, नारायण राणेंविरोधात तक्रार दाखल

शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी सोलापुरातील बार्शी पोलिसात खासदार नारायण राणेंविरोधात तक्रार दिली

मुख्यमंत्र्यांबाबत नको ते शब्द, नारायण राणेंविरोधात तक्रार दाखल

सोलापूर : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात सोलापुरात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना ‘गांडूळ, पुळचट’ यासारखे शब्द वापरल्याने बार्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Complaint against BJP MP Narayan Rane in Barshi for insulting CM Uddhav Thackeray)

शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी बार्शी पोलिसात नारायण राणेंविरोधात तक्रार दिली, त्यावरुन कलम 504, 506 नुसार अदखलपात्र एनसी दाखल करण्यात आली आहे. राणेंनी भाषणातून मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काय आहे तक्रार?

“शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने भाजप खासदार नारायण राणे यांनी टीका केली. चॅनेल, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून राणेंनी उद्धव ठाकरे यांना तुमची मुख्यमंत्री होण्याची लायकी नाही, पुळचट आणि बुद्धू मुख्यमंत्री, गांडूळ, याची लायकी नाही, तसेच मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी शिवीगाळ आणि दमदाटीची भाषा वापरुन सर्वसामान्य आणि शिवसैनिकांचा अपमान केला आहे. तक्रार दाखल करुन कारवाई न केल्यास सोमवारी त्यांच्या पुतळ्याचे दहन केले जाईल” असे तक्रारपत्र शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी बार्शी पोलिसात दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना बेडूक आणि बेडकाची पिल्ले, अशा अप्रत्यक्ष शब्दांत टोले लगावले होते. या टीकेला नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा अक्षरश: पाणउतारा केला.

नारायण राणे काय म्हणाले?

दसरा मेळावा म्हणजे 47 शिवसैनिकांमध्ये झालेली भव्य सभा होती, असा उपरोधिक टोला राणेंनी लगावला. (Complaint against BJP MP Narayan Rane in Barshi for insulting CM Uddhav Thackeray) आजवर महाराष्ट्रात जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या कार्याने आणि भाषणशैलीने देशात राज्याची प्रतिष्ठा वाढवली. याला सध्याचे मुख्यमंत्री अपवाद आहेत. तेच उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर टीका करतात. मोदींच्या धोरणावर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. त्यांनी महाराष्ट्राचा कारभार सांभाळावा, असे नारायण राणे म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

पंतप्रधान मोदींच्या धोरणावर बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही; नारायण राणेंचा घणाघात

उद्धव ठाकरेंनी बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवलं, नारायण राणेंचा घणाघात

(Complaint against BJP MP Narayan Rane in Barshi for insulting CM Uddhav Thackeray)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *