VIDEO : उर्मिला मातोंडकरसमोर काँग्रेस-भाजप कार्यकर्त भिडले!

VIDEO : उर्मिला मातोंडकरसमोर काँग्रेस-भाजप कार्यकर्त भिडले!

मुंबई : उत्तर मुंबईल लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे भिडले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्थानकाबाहेर हा प्रकार घडला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला.

उर्मिल मातोंडकर या उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी उर्मिला मातोंडकर या बोरीवली स्थानकाबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. मात्र, तिथे आधीच भाजपचे कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला मातोंडकर या बोरीवली रेल्वे स्थानकाबाहेर पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

उर्मिला मातोंडकर यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्थानाकाबाहेर नियोजित होता. त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरु झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला. शेवटी परिसरात एकच गोंधळ उडाला. प्रसंग हाणामारीपर्यंत आला.

दरम्यान, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमधील वाद निवळला.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *