VIDEO | काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांचा ‘ले पंगा’, कबड्डीच्या मैदानात प्रतिस्पर्ध्याला चीतपट

राजकारणात विरोधकांशी दोन हात करणारे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर कबड्डीच्या मैदानातही जोशात उतरताना दिसले (Balu Dhanorkar plays Kabaddi)

VIDEO | काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांचा 'ले पंगा', कबड्डीच्या मैदानात प्रतिस्पर्ध्याला चीतपट
काँग्रेस खासदार बाळू धानोरकर कबड्डीच्या मैदानात


चंद्रपूर : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांना कबड्डी खेळताना पाहण्याचा योग समर्थकांना आला. धानोरकरांनी चंद्रपुरात कबड्डीच्या मैदानात उतरुन प्रतिस्पर्ध्याला चीत केले. (Congress Chandrapur MP Balu Dhanorkar plays Kabaddi)

राजकारणात विरोधकांशी दोन हात करणारे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर कबड्डीच्या मैदानातही जोशात उतरताना दिसले. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीमध्ये कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन बाळू धानोरकरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर धानोरकर यांनी कुस्तीचे डाव आजमावले.

प्रतिस्पर्ध्याला काही मिनिटातच चीत

बाळू धानोरकर यांनी स्वतः मैदानात उतरुन खेळाडूंचा उत्साह वाढवला. काही मिनिटातच त्यांनी कबड्डीचे मैदान गाजवले. प्रतिस्पर्धी संघाच्या गड्याला चीत करत धानोरकरांनी समर्थकांना आश्चर्याचा धक्का दिला.

आधी भाजप आमदार सुरेश धस यांनी लेकासोबत कुस्ती खेळत सर्वांना चकित केले होते. आता धानोरकरांनी कबड्डीसारखा रांगडा खेळ खेळत राजकीय मैदानातही चीत करण्याचा संदेश दिल्याची चर्चा आहे.

पाहा व्हिडीओ :

कोण आहेत बाळू धानोरकर?

बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे मूळचे काँग्रेसी नेते नाहीत. लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसने उमेदवार घोषित केला होता. मात्र, बाळू धानोरकरांसाठी काँग्रेसने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला राज्यात केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला, ती म्हणजे चंद्रपूरची जागा. (Congress Chandrapur MP Balu Dhanorkar plays Kabaddi)

केंद्रीय मंत्र्याचा पराभव करणारा जायंट किलर 

बाळू धानोरकर यांना काँग्रेसचं तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला. ते चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. केंद्रीय मंत्री असलेल्या हंसराज अहिर आणि शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’ झाली. मात्र अखेर बाळू धानोरकर यांचा 45 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला.

तीन वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्रिपद भूषवलेल्या भाजप नेत्याला एका आमदाराने पराभवाची धूळ चारल्याने धानोरकर जायंट किलर ठरले होते. त्यामुळे बाळू धानोरकरांना थेट पंतप्रधानांना आव्हान देण्याचा विश्वास वाटत आहे.

संबंधित बातम्या :

शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकरांनी काँग्रेसची लाज राखली!

काँग्रेसच्या एकमेव खासदाराने करुन दाखवलं, यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची खुर्ची समर्थकाला

महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदाराचा मोदींविरोधात शड्डू, लोकसभेला आव्हान देण्याची तयारी

(Congress Chandrapur MP Balu Dhanorkar plays Kabaddi)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI