‘वेदांता’ कोणामुळे राज्याबाहेर गेला?, लोंढे म्हणतात फडणवीसांनी खोटं बोलू नये तर देसाई म्हणतात तत्कालीन जलसंपदा मंत्री…

वेदांतावरून पुन्हा एकदा राजकारण रंगताना दिसत आहे. वेंदाता राज्याबाहेर जाण्यासाठी सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे.

'वेदांता' कोणामुळे राज्याबाहेर गेला?, लोंढे म्हणतात फडणवीसांनी खोटं बोलू नये तर देसाई म्हणतात तत्कालीन जलसंपदा मंत्री...
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 3:08 PM

मुंबई : वेदांतावरून पुन्हा एकदा राजकारण रंगताना दिसत आहे. वेंदाता राज्याबाहेर जाण्यासाठी सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. तर महाविकास आघाडीमुळेच वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. वेदांता प्रकल्प राज्याबाहेर कोणामुळे गेला यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी खोटं न बोलता राज्यात गुंतवणूक आणावी असं लोंढे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मात्र तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांमुळेच प्रकल्प गेल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

अतुल लोंढे नेमकं कय म्हणाले?

वेदातांवरून अतुल लोंढे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘आरटीआयमध्ये माहिती मागितली जाते, आणि ती माहिती संध्याकाळी मिळते सुद्धा, आम्हाला तीस – तीस दिवस माहिती मिळत नाही. माहिती उपलब्ध नाही, या माहितीचा या विभागाशी संबंध नाही अशी कारणे दिली जातात. काल पण खोटं बोलले आणि आज पण पुन्हा एकदा खोटं बोलले. त्यांना आठवत नाही आपण मागे काय बोललो होतो त्यामुळे पुन्हा एकदा ते खोटे बोलले आहेत.  महाराष्ट्र आपला आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण आपले आहेत. इथे क्रेडिट  घेणं राजकारण करणं योग्य नाही. खोट न बोलता रोजगार आणला तर विरोधी पक्षदेखील तुमच्यासोबत आहे, असं म्हणत लोंढे यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

शंभूराज देसाई यांनी काय म्हटलं?

तर दुसरीकडे मंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र वेदांता प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी विरोधकच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांमुळेच प्रकल्प गेल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.