अमित शाह यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला!

नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीतील आपल्या 20 उमेदवारांची पुढील यादी जाहीर केली आहे. यात भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधातील उमेदवाराचीही घोषणा केली. काँग्रेसने शाह यांच्याविरोधात गुजरातचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ. सी. जे. चावडा यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. चावडा उत्तर गांधीनगरमधून आमदार आहेत. भाजपने काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांविरोधात दमदार नेते निवडणूक मैदानात उतरवले आहेत. 2014 […]

अमित शाह यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीतील आपल्या 20 उमेदवारांची पुढील यादी जाहीर केली आहे. यात भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधातील उमेदवाराचीही घोषणा केली. काँग्रेसने शाह यांच्याविरोधात गुजरातचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ. सी. जे. चावडा यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. चावडा उत्तर गांधीनगरमधून आमदार आहेत.

भाजपने काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांविरोधात दमदार नेते निवडणूक मैदानात उतरवले आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसह याही निवडणुकीत भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत इराणी यांनी राहुल गांधींना कडवी झुंज दिली होती, मात्र त्यांना ही झुंज विजयात परावर्तीत करता आली नाही आणि इराणी यांचा पराभव झाला. यावेळी त्यांनी पुन्हा नव्या दमाने राहुल गांधींविरोधात उमेदवारी घेतली आहे. दुसरीकडे काँग्रेसकडूनही भाजपच्या प्रमुख नेत्यांविरोधात निवडणूक रणनीती आखली जात आहे. त्याचाच भाग म्हणून शाह यांच्याविरोधात चावडा यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचे उमेदवार आणि आमदार सी. जे. चावडा यांनी आपली सरकारी नोकरी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. असे असूनही ते 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे.

गांधीनगरमधून एकाच गावचे 2 जावई आमने-सामने

गांधीनगरमधून निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरलेले शाह आणि चावडा हे एकाच गावचे रहिवासी तर आहेच, सोबत ते एकाच गावचे जावईदेखील आहेत. शाह यांचे मुळ गाव गांधीनगरमधील मानसा आहे, तर चावडा देखील मानसाचेच रहिवासी आहेत. त्या दोघांचेही लग्न विजापूर तालुक्यातील पिलवाई गावात झाले आहे. हा योगायोग झाल्याने यावेळी गांधीनगरमध्ये एकाच गावच्या 2 जावयांचा सामना रंगणार आहे.

दोन्ही उमेदवारांचे नातेवाईक त्यांना मतदान करु शकणार नाही

निवडणूक म्हटलं की उमेदवार अगदी एक एक मतासाठी मेहनत घेताना पाहायला मिळतात. अशावेळी गांधीनगरमधून निवडणूक मैदानात उतरलेल्या या दोन्ही उमेदवारांना आपल्या नातेवाईकांच्याच मतांना मुकावे लागणार आहे. दोघांच्याही गावातील मतदारांना या उमेदवारांना मतदान करता येणार नाही. दोन्ही उमेदवार गांधीनगरच्या मानसाचे असले मानसा गाव गांधीनगर लोकसभा मतदारसंघात येत नसून महेसाणा मतदारसंघात येते.

पाहा व्हिडीओ:

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.