काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांचाही दुष्काळ दौरा, बुलडाण्यातून सुरुवात

काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांचाही दुष्काळ दौरा, बुलडाण्यातून सुरुवात

बुलडाणा : मराठवाडा आणि विदर्भात भीषण दुष्काळा आहे. माणसांच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. यामध्ये राजकीय नेत्यांचे दुष्काळ दौरे सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री जिल्ह्यात फिरुन परिस्थितीचा आढावा घेत आहेत, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. यामध्ये आता काँग्रेसचीही भर पडली आहे. काँग्रेसच्या 11 आमदारांची समिती दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टंचाई निवारणाच्या विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविवण्याचे आदेश महसूल, कृषी, पशुसंवर्धन, सहकार, जलसंधारण, जलसंपदा आणि ग्रामविकास विभागाच्या यंत्रणांना दिले आहेत. दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखडा नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याचे दौरे सुरु केले आहेत. विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसच्या आमदारांनी बुलडाण्यातून दौऱ्याला सुरुवात केली.

बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसचं 11 आजी-माजी आमदारांचं पथक दाखल होणार आहे. दोन दिवस त्यांचा पाहणी दौरा चालणार आहे. तर विदर्भातील दौरा आटोपल्यावर याची नागपूरला सांगता होईल. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि नागपूर या सहा जिल्ह्यात काँग्रेसच्या आमदारांचा दौरा असेल.

काँग्रेस नेते दुष्काळी भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांची भेटी घेणार आहेत. या समितीमध्ये राज्याचे विधिमंडळ उपनेता विजय वडेट्टीवार, वसंत पुरके, आ. वीरेंद्र जगताप, आ. रंणजीत कांबळे, आ.राजेंद्र मूळक, आ. सुनील केदार, आ.राहुल बोंद्रे, आ. अमर काळे, माजी आ. नातिकोद्दीन खतीब, आ. अमित झनक आणि आ. अतुल लोंढे यांचा समावेश आहे.

Published On - 3:25 pm, Mon, 13 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI