रात्री लक्ष्मी आली तर नाही म्हणू नका, काँग्रेस मंत्र्याचा मतदारांना सल्ला, किरीट सोमय्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

काँग्रेस नेत्या आणि कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना अनोखा सल्ला दिला (Yashomati Thakur election campaigning) आहे.

Yashomati Thakur election campaigning, रात्री लक्ष्मी आली तर नाही म्हणू नका, काँग्रेस मंत्र्याचा मतदारांना सल्ला, किरीट सोमय्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

अकोला : काँग्रेस नेत्या आणि कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना अनोखा सल्ला दिला (Yashomati Thakur election campaigning) आहे. ‘रात्रीत लक्ष्मी आली तर येऊ द्यायचं, नाही म्हणायचं नाही’ असे ठाकूर यांनी भाषणादरम्यान म्हटलं. त्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक तक्रार दाखल केली आहे. यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात (Yashomati Thakur election campaigning) आहे.

अकोला जिल्हातील पातूर तालुक्यातील आलेगाव जिल्हापरिषद सर्कलमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचारासाठी यशोमती ठाकूर आल्या होत्या. त्यावेळी ”रात्रीची लक्ष्मी घरी येते, तर येऊ द्या तिला नाही म्हणू नका” असे सभेतील भाषणादरम्यान यशोमती ठाकूर म्हणाल्या. त्याच्या या वक्तव्यानंतर मतदारही गोंधळले.

याचा नेमका अर्थ काय हे मतदारांना चांगलेच समजले. मात्र ही लक्ष्मी नेमकी कुणाच्या पावलाने येईल. काँग्रेसच्या की इतर पक्षाच्या हे मात्र मतदारांना स्पष्ट झालंलं नाही. याचं उत्तर ठाकूर स्वत:चं देऊ (Yashomati Thakur election campaigning) शकतील.

सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम अकोला जिल्ह्यात जोमात सुरू आहे. या निवडणूक प्रचाराला दिग्गच नेत्यांची मांदियाळी जिल्ह्याभरात पाहायला मिळतं आहे. .अशाचप्रकारे काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करायला अमरावतीच्या आमदार आणि कॅबीनेटमंत्री यशोमती ठाकूर यांनी मतदारांना चक्क रात्रीची लक्ष्मी घेण्याचा सल्ला दिला आहे.

मतदारांना दिलेल्या या सल्ल्याबरोबरच ठाकूर यांनी भाजप आणि मोदींवर सडकून टीका केली. रस्त्यातील खड्यांचाही विषय आवर्जून सांगितला. मात्र एका जबाबदार कॅबिनेट मंत्र्याने रात्रीच्या लक्ष्मीचा सल्ला देणं कितपत योग्य आहे. असा प्रश्न मतदारांकडून उपस्थित केला जात (Yashomati Thakur election campaigning) आहे.

दरम्यान नुकत्याचं  जाहीर झालेल्या खातेवाटपात यशोमती ठाकूर यांना महिला आणि बालकल्याण खातं देण्यात आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *