फडणवीस सांगतील त्या पक्षात जाईन, मुंबईतील काँग्रेस आमदाराची घोषणा

फडणवीस सांगतील त्या पक्षात जाईन, मुंबईतील काँग्रेस आमदाराची घोषणा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील, त्या पक्षात जाईन, अशी घोषणा काँग्रेसचे बंडखोर आमदार कालिदास कोळंबकर यांनी केली आहे. तसेच, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार करणार असल्याचेही आमदार कालिदास कोळंबकर यांनी म्हटले आहे. कोळंबकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मी कोणत्याही क्षणी काँग्रेस सोडू शकतो. सध्या मी भाजप किंवा शिवसेनेत जाण्याचे निश्चित केले नाही, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदेश देतील, त्यानुसार मी पक्ष प्रवेश करेन.”, अशी घोषणा आमदार कालिदास कोळंबकर यांनी केली आहे.

दरम्यान, गेल्याच महिन्यात आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. “माझी कामं मुख्यमंत्र्यानी केली आहेत, त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी आहे. फक्त नायगावमधील पोलिसांचा प्रश्न सुटला की मी भाजपमध्ये प्रवेश करेन, असं कालिदास कोळंबकर यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं होतं. तसेच, मी इतकी वर्षे आमदार आहे, पण स्थानिक लोकांचे मोठे प्रश्न सुटले नव्हते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते सोडवले. सेनेच्या अनेक नेत्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत. माझा प्रवेश काही अटी शर्थी ठरला की होईल, असं आमदार कालिदास कोळंबकर म्हणाले होते.

कालिदास कोळंबकर कोण आहेत?

  • कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत.
  • सलग सातवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.
  • नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून कोळंबकर यांची ओळख आहे.
  • नारायण राणेंसोबत त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
  • राणेंसोबत आलेले सर्व आमदार शिवसेनेत परतले, मात्र केवळ कालिदास कोळंबकर हे काँग्रेसमध्येच राहिले. आता कालिदास कोळंबकर काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत.

संबंधित बातम्या :

मी भाजपमध्ये प्रवेश करणार, पण एकच अट…: आमदार कालिदास कोळंबकर

राणेंनी शिवसेनेतून सोबत नेलेल्या 10 पैकी सध्या फक्त एकाची साथ


Published On - 1:53 pm, Mon, 15 April 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI