राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्री निधी देत नाहीत, काँग्रेस आमदारांची वरिष्ठांकडे नाराजी

काँग्रेसच्या आमदारांनी काँग्रेस नेत्यांसमोरच (Congress MLAs expressed disappointment) नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्री निधी देत नाहीत, काँग्रेस आमदारांची वरिष्ठांकडे नाराजी
Follow us
| Updated on: Mar 13, 2020 | 12:17 PM

मुंबई : काँग्रेसच्या आमदारांनी काँग्रेस नेत्यांसमोरच (Congress MLAs expressed disappointment) नाराजी व्यक्त केली आहे. विधानभवनात आज सकाळी मंत्री आणि आमदारांच्या झालेल्या बैठकीत काँग्रेस आमदारांनी तुटपुंज्या निधीवरुन नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. (Congress MLAs expressed disappointment) ग्रामविकास अंतर्गत 25-15 विकासनिधीची तरतूद आहे. मात्र ठोक तरतूद ही फक्त राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्वाधिक दिली जात असल्याचा दावा काँग्रेस आमदारांचा आहे. शिवाय नगरविकास खात्यांतर्गतही नगरपालिका, नगरपरिषद निधी काँग्रेस आमदारांना दिला जात नाही, यावरुन काँग्रेस आमदारांनी नाराजी व्यक्त केली.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून काँग्रेस आमदारांना डावलले जाण्यावरुन काही आमदार नाराज आहेत. हीच नाराजी त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ  नेत्यांसमोर बोलून दाखवली.

पुढील आठवड्यात महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होत आहे. या बैठकीत प्रमुख नेत्यांसमोर याबाबत चर्चा करून तोडगा काढण्याबाबत, काँग्रेस नेत्यांनी आमदारांना आश्वासन दिलं.

राष्ट्रवादीकडे ग्रामविकास, शिवसेनेकडे नगरविकास खाते

काँग्रेस आमदारांची ज्या खात्याबाबत तक्रार आहे, ती खाती राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे आहेत. ग्रामविकास खाते राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे तर नगरविकास खाते शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. आता काँग्रेसच्या या तक्रारीनंतर महाविकास आघाडीचे नेते समन्वय समितीच्या बैठकीत काय तोडगा काढतात हे पाहावं लागेल.

भाजप नेत्यांचे दावे

दरम्यान, महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये ताळमेळ नाही, त्यामुळे हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, असा दावा सातत्याने भाजप नेत्यांकडून केला जात आहे. तिन्ही पक्षांचे विचार वेगवेगळे आहेत, त्यामुळे सरकार कोसळेल असंही भाजप नेते म्हणतात.

किमान समान कार्यक्रम

महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रम यावर स्थापन झालं आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांचे विचार वेगळे असले, तरी कॉमन मिनिमन प्रोग्रामवर हे सरकार चालेल आणि 5 वर्ष पूर्ण करेल, असा दावा महाविकास आघाडीकडून केला जातो.

संबंधित बातम्या 

कोरोना गो-गोप्रमाणे महाविकासआघाडी गो-गो म्हणावं लागेल : रामदास आठवले

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.