साडे पाच तासांच्या चर्चेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक संपली

काँग्रेस नेते बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. संध्याकाळी पाचवाजता या बैठकीला सुरुवात झाली.

साडे पाच तासांच्या चर्चेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक संपली

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation ) वेगवान घडामोडी घडत आहेत. काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सर्व काँग्रेस नेते बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. संध्याकाळी पाचवाजता या बैठकीला सुरुवात झाली. जवळपास साडे पाच तास या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation )

या बैठकीला राष्ट्रवादीकडून अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनील तटकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, नवाब मलिक तर काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, जयराम रमेश, सी वेणुगोपाल, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान असे एकूण 15 जणांनी चर्चा केली.

महासेनाआघाडीच्या किमान समान कार्यक्रमातले सहा EXCLUSIVE मुद्दे

शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाच्या दृष्टीने या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. किमान समान कार्यक्रम, त्याची अंमलबजावणी, सत्तास्थापनेतील अडथळे अशा सर्वांगीण बाजू या बैठकीत चर्चिल्या गेल्या.

काँग्रेसचीही बैठक

दरम्यान, या बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक झाली.  राज्यातील सर्व बडे नेते या बैठकीला उपस्थित होते.  या बैठकीत शिवसेनेसोबत सत्तेत जाण्याबाबतची रणनीतीवर चर्चा झाली.

सोनिया गांधींचा हिरवा कंदील?

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हं दिसू लागली (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहेत. कारण काँग्रेस हायकमांडच्या दिल्लीतील बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत जाण्यास संमती दर्शवली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहे.

काँग्रेसच्या बैठकीनंतर अश्विनीकुमार आणि संजय राऊत यांची भेट

काँग्रेस नेते आणि माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची दिल्लीत भेट घेतली. संजय राऊत यांच्या घरी ही भेट झाली. काँग्रेसची  बैठक संपल्यानंतर अश्विनीकुमार यांनी राऊत यांच्या घरी येण्यामागचे कारण काय? अश्विनीकुमार काँग्रेस हायकमांडचा काही निरोप घेऊन आले होते का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले. संजय राऊत आणि अश्विनीकुमार यांच्यात जवळपास वीस मिनिटे चर्चा झाली.

संबंधित बातम्या  

महासेनाआघाडीच्या किमान समान कार्यक्रमातले सहा EXCLUSIVE मुद्दे   

पवार-मोदी 45 मिनिटे भेट, शरद पवारांनी मोदींना दिलेलं पत्र जसंच्या तसं  

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI