रजनी पाटील म्हणतात, भाजपनं मनाचा मोठेपणा दाखवला, विलासराव, सातवांच्या नंतर नेमकं काय घडलं?

रजनी पाटली यांनी "मला आज माझा लहान भाऊ राजीव सातव यांची आठवण येते",अशा भावना व्यक्त केल्या. भाजपनं मनाचा मोठेपणा दाखवला, त्याबद्दल त्यांचे आभार अशा भावना रजनी पाटील यांनी व्यक्त केल्या.

रजनी पाटील म्हणतात, भाजपनं मनाचा मोठेपणा दाखवला, विलासराव, सातवांच्या नंतर नेमकं काय घडलं?
Rajani Patil


मुंबई: काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनाने होत असलेल्या पोटनिवणुकीतून भाजपनं संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजप उमेदवार संजय उपाध्याय हे आज आपला अर्ज मागे घेतल्यानं काँग्रेसच्या रजनी पाटील (Rajani Patil) यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. रजनी पाटली यांनी “मला आज माझा लहान भाऊ राजीव सातव यांची आठवण येते”,अशा भावना व्यक्त केल्या. भाजपनं मनाचा मोठेपणा दाखवला, त्याबद्दल त्यांचे आभार अशा भावना रजनी पाटील यांनी व्यक्त केल्या.

राजीव सातव यांची आठवण येते

मला आज माझा लहान भाऊ राजीव सातव यांची आठवण येते, अशा भावना रजनी पाटील यांनी व्यक्त केल्या. सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवला,दिल्लीत मला आशीर्वाद मिळाले. राज्यातून देखील अनेकांनी पुढाकार घेऊन ही मला संधी मिळाली, असं पाटील यांनी म्हटलं.

भाजपचं आभार

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी समजूतदारपणानं भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला त्यांचे ही आभार मानते, असं रजनी पाटील यांनी म्हटलं.  नुकतंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एखाद्याच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याची परंपरा असल्याची आठवण भाजपला करुन दिली होती. तसंच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आता काँग्रेसची विनंती भाजपने मान्य केली.

काँग्रेसनं त्यावेळी उमदेवार दिला नव्हता

भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर ही काँग्रेस ने उमेदवार दिला नव्हता. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मलाच उमेदवारी दिली होती, आताही राजीव सातव यांच्या निधनानंतर उमेदवारी दिली आहे. बिनविरोध निवडणुकीचा पायंडा काँग्रेसने जपला, तीच परंपरा पाहायला मिळत आहे, असं रजनी पाटील म्हणाल्या. चंद्रकांतदादा पाटील काय बोलले होते याबद्दल मला काही बोलायचे नाही, असंही त्या म्हणाल्या.

कोण आहेत रजनी पाटील?

रजनी पाटील ह्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. आता जम्मू आणि काश्मीरच्या त्या काँग्रेस प्रभारी आहेत. ठाकरे सरकारनं ज्या 12 नेत्यांची नाव विधान परिषदेवर घेण्यासाठी राज्यपालांकडे पाठवलेली आहेत. त्यात काँग्रेसनं रजनी पाटील यांचंही नाव दिलेलं आहे. 1996 साली त्या बीडमधून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. राजकारणाची सुरुवात त्यांनी जिल्हा परिषदेतून केलेली आहे.

मित्राने मित्राचा शब्द पाळला!

महाराष्ट्राची परंपरा राहिलीय की निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपनं अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्या विनंतीचा मान ठेवला जाईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर दिली होती. तर संघटनेत चर्चा करुन फडणवीस निर्णय घेतील असं त्यांनी सांगितल्याचं देखील पटोलेंनी स्पष्ट केलं होतं. आज अखेर चार दिवसांनंतर निवडणुकीतून माघार घेत असल्याचं भाजपने जाहीर करुन काँग्रेसला दिलेला शब्द पाळला आहे.

इतर बातम्या:

 

Congress Rajya Sabha By election Candidate Rajani Patil said thanks to BJP and remeber Rajiv Satav

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI