पंतप्रधान मोदींकडून भरसभेत दुसऱ्यांदा आयपीएलचा उल्लेख कशामुळे?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील सभेत आयपीएलचा उल्लेख केल्यानंतर पुन्हा एकदा राजस्थानमधील सभेतही आयपीएलचा उल्लेख केला. सुरक्षेचं कारण दाखवत काँग्रेस सरकारकडून आपल्या देशाची मालिका परदेशात ढकलली जायची, पण आम्ही निवडणुकाही पार पाडतोय आणि आयपीएलही, असं म्हणत मोदींनी काँग्रेसच्या धोरणांवर टीका केली. निवडणुकांसोबत आयपीएलचं आयोजन ही पोलिसांची मोठी कामगिरी असल्याचं सांगत, मोदींनी सर्वात […]

पंतप्रधान मोदींकडून भरसभेत दुसऱ्यांदा आयपीएलचा उल्लेख कशामुळे?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील सभेत आयपीएलचा उल्लेख केल्यानंतर पुन्हा एकदा राजस्थानमधील सभेतही आयपीएलचा उल्लेख केला. सुरक्षेचं कारण दाखवत काँग्रेस सरकारकडून आपल्या देशाची मालिका परदेशात ढकलली जायची, पण आम्ही निवडणुकाही पार पाडतोय आणि आयपीएलही, असं म्हणत मोदींनी काँग्रेसच्या धोरणांवर टीका केली. निवडणुकांसोबत आयपीएलचं आयोजन ही पोलिसांची मोठी कामगिरी असल्याचं सांगत, मोदींनी सर्वात लोकप्रिय टूर्नामेंट देशाच्या बाहेर पाठवल्याचा आरोप काँग्रेसवर केला.

आयपीएल तरुणांची आवडती मालिका आहे. देशाची ओळख आयपीएलसोबत जोडलेली आहे. संपूर्ण जगाचं लक्ष आपल्यावर असतं. पण 2009 आणि 2014 मध्ये भारताचा सन्मान असलेली ही मालिका भारतातून बाहेर पाठवली. तत्कालीन काँग्रेस सरकारला दहशतवाद्यांची भीती वाटायची, कारण, त्यांच्यात दहशतवाद्यांचा सामना करण्याची क्षमता नव्हती. म्हणून त्यांनी निवडणुकीचं कारण देत सुरक्षा देण्यासाठी असमर्थ असल्याचं सांगितलं आणि मालिका बाहेर खेळवली गेली, असं मोदी म्हणाले.

निवडणुका आजही होत आहेत आणि पोलीसही तेच आहेत. रामनवमीपासून ते हनुमान जयंती, रमजान येत आहे, पण आयपीएलही सुरु आहे. हे शेपटीवर पाय देऊन पळणाऱ्या सरकारमध्ये बसले होते. मोदीने छाती दाखवली आणि जिंकलं. आयपीएल देशात होणारच. ते गोळी चालवतील, तर मोदी गोळा चालवेन, असं हल्लाबोल मोदींनी केला.

लोकसभा निवडणुकीचं कारण दाखवत 2009 मध्ये तत्कालीन सरकारने सुरक्षा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे मालिका दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली. तर 2014 लाही काँग्रेस सरकार होतं. तेव्हाही निम्मे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आले. तत्कालीन सरकारने पोलिसांवर निवडणुकांचा ताण असल्याचं सांगत सुरक्षेला नकार दिला होता.

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.