शिंदे गटाकडून कामाख्या देवीचं दर्शन, महाविकास आघाडीनं विचारला हा सवाल

गणेश सोळंकी

गणेश सोळंकी | Edited By: गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Nov 26, 2022 | 10:14 PM

खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, मी गुवाहाटीला बऱ्याच वर्षांपासून जातो.

शिंदे गटाकडून कामाख्या देवीचं दर्शन, महाविकास आघाडीनं विचारला हा सवाल

बुलडाणा – सत्तांतरानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. यावरून महाविकास आघाडीनं शिंदे गटावर निशाणा साधला. महाराष्ट्रातले देव संपलेत का, असा सवाल संजय राऊत यांनी केला. सत्तांतरानंतर पाच महिन्यांनी कामाक्ष्या देवीचं दर्शन शिंदे गटातील आमदारांनी घेतलं. एअर इंडियाच्या विशेष विमानानं गुवाहाटीत पोहचले. एक तास मंदिरात होते. सर्वच जण खुश असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

सर्वात जास्त खोके बुलडाण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील देव संपले का. सर्व प्रकारचे देव या बुलडाणा जिल्ह्यात आहेत. राज्यातील देव संपले का, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

बुलडाण्यात रेणुकादेवीचं मंदिर आणि रेडे गेले गुवाहाटीला. आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी गुवाहाटीला गेल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. सर्व आमदारांना एकत्र ठेवायचंय म्हणून फिरताहेत, असं आदित्य ठाकरे म्हणालेत. तिथून पुन्हा गोवा, सूरत येथे जाणार का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केलाय.

राक्षसी महत्त्वाकांशा होत्या. त्यांना काही कामं राहिलेलं नाही. भक्तिभावानं आलोत. आम्हाला काम करू द्या. त्यांना टीका करू द्या, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.

आपल्याकडं ज्ञानेश्वर महाराज यांनी रेड्यांकडून वेद म्हणवून घेतले. इकडं मुख्यमंत्री ४० रेड्यांना घेऊन गुवाहाटीला गेल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

काही ठिकाणी बकरे-कोंबडे कापतो. तसं तिथं रेड्याचा बळी देतात, असं म्हणतात. पण, कोणत्या रेड्याला कापतात माहीत नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, मी गुवाहाटीला बऱ्याच वर्षांपासून जातो. पण, तिथं दर्शन घेतो नि परत येतो. रेड्यांचा बळी मी दिलेला नाही.

 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI