AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मास्क लावून काळजी घ्या’, राज ठाकरेंचं नाव न घेता अजित पवारांचा टोला

'काही नेते म्हणतात मी मास्क लावतच नाही पण बाकीच्यांना कोरोना झाला तर काय कारायचं?', असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता लगावला.

'मास्क लावून काळजी घ्या', राज ठाकरेंचं नाव न घेता अजित पवारांचा टोला
अजित पवार आणि राज ठाकरे
| Updated on: Mar 04, 2021 | 5:41 PM
Share

मुंबई : ‘काही नेते म्हणतात मी मास्क लावतच नाही पण बाकीच्यांना कोरोना झाला तर काय कारायचं?’, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं नाव न घेता लगावला. महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत बोलताना त्यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांना टोला हाणला. (DCM Ajit pawar Suggession MNS Raj thackeray over Face Mask)

मास्क लावून काळजी घ्या

“कोरोनाविषयक नियम पाळणं हे गरजेचं आहे. पण काही नेते म्हणतात की मी मास्क लावतच नाही. पण असं न करता मास्क लावून काळजी घ्या, असा सल्ला अजित पवार यांनी राज ठाकरे यांना दिला. तसंच हा सल्ला देताना तुम्ही मास्क लावत नसल्याने इतरांना कोरोना झाला तर काय?”, असा प्रश्नही त्यांनी राज यांना विचारला.

राज ठाकरेंच्या मास्कवरुन अजितदादांचा प्रवीण दरेकरांना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मास्क लावायला पाहिजे, असं सांगताना ते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे जुने नेते आहेत, असं हसत हसत अजितदादा म्हणाले. अजितदादांच्या हसण्यावर सभागृहातही एकच हशा पिकला. त्यावर प्रवीण दरेकर यांनी अजितदादांना मिश्किलपणे उत्तर दिलं असता, ‘मास्क लावून त्यांनी आपली काळजी घ्यावी आणि महाराष्ट्रातील जनतेलाही मी कोरोनाचे नियम पाळण्याविषयी आवाहन करतो’, असं म्हणत अजितदादांनी फटकेबाजी आवरती घेतली.

कोरोनाविरोधी त्रिसूत्री पाळा, अजितदादांचं आवाहन

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण पुन्हा एकदा वाढत असताना कोरोनाविषय नियम पाळले पाहिजे, असं सांगताना चेहऱ्याला मास्क लावला पाहिजे, वारंवार हात धुतला पाहिजे. तसंच फिजिकल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. (DCM Ajit pawar Suggession MNS Raj thackeray over Face Mask)

मी मास्क घालतच नाही…!

मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राज ठाकरे यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. साहजिकच कॅमेरे राज ठाकरे यांच्यावर खिळले. पत्रकारांनी राज ठाकरे यांना तुम्ही मास्क लावलेला नाही, असं छेडलं असता, ‘मी मास्क लावतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं.

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन सरकार करत आहे. मात्र राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत तोंडाला मास्क लावलेला दिसला नाही. साहजिकच राज ठाकरेंच्या तोंडाला मास्क नसलं की लोकांच्यामध्ये चर्चा रंगते.

उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला मास्क न लावता प्रवेश

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर 7 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चेहऱ्याला मास्क न लावता मंत्रालयात आले होते. सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या तोंडाला मास्क होता परंतु राज ठाकरे यांच्याच चेहऱ्यावर मास्क नव्हता. यावेळीही पत्रकारांनी राज यांना प्रश्न विचारला असता, ‘सगळ्यांनी मास्क लावला आहे, म्हणून मी लावला नाही’, असं मोघम उत्तर देत, राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली.

कृष्णकुंजवरही मास्क न लावता लोकांना भेटतात

विविधप्रश्नी अनेक पक्षाचे, संघटनेचे लोक राज ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटत असतात. राज ठाकरे हे देखील त्यांना भेटून त्यांच्या समस्यांचे निवारण करत असतात. परंतु राज ठाकरे तिथेही मास्क लावलेले दिसून येत नाहीत.

(DCM Ajit pawar Suggession MNS Raj thackeray over Face Mask)

हे ही वाचा :

मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय; राज ठाकरे यांनी ‘दादू’चं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का?

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...