कोकणात युतीचं धुमशान, दीपक केसरकरांचा पराभव करणार, भाजपच्या राजन तेलींचा निर्धार

कोकणात आता खऱ्या अर्थाने राजकीय धुमशान सुरु झालं आहे (Kokan Assembly Elections). जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात (Sawantwadi Constituency) यावेळी भाजपकडूनच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कोकणात युतीचं धुमशान, दीपक केसरकरांचा पराभव करणार, भाजपच्या राजन तेलींचा निर्धार
Deepak Kesarkar vs Rajan Teli
Follow us
| Updated on: Oct 01, 2019 | 6:00 PM

सिंधुदुर्ग : कोकणात आता खऱ्या अर्थाने राजकीय धुमशान सुरु झालं आहे (Kokan Assembly Elections). जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात (Sawantwadi Constituency) यावेळी भाजपकडूनच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपचे राज्य चिटणीस राजन तेली यांनी दीपक केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे (Deepak Kesarkar vs Rajan Teli). यावेळी दीपक केसरकर यांचा पराभव अटळ आहे आणि त्यासाठीच मी रिंगणात उतरलो आहे, असा दावा राजन तेली यांनी केला.

नारायण राणे यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लावणाऱ्या दीपक केसरकर यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सध्या भाजपकडून सुरू आहेत (Deepak Kesarkar vs Rajan Teli). दीपक केसरकर यांची ही तीसरी टर्म आहे. सावंतवाडी मतदारसंघात दोनदा विजयी झालेला उमेदवार तीसऱ्यांदा विजयी होऊ शकलेला नाही, असा सावंतवाडीचा इतिहास आहे आणि हाच इतिहास पुसण्याचा प्रयत्न दीपक केसरकर यांच्याकडून सुरु आहे(Deepak Kesarkar vs Rajan Teli). मात्र, शिवसेनेचा मित्र पक्ष भाजपनेच यावेळी केसरकर यांच्या पराभवाचा विडा उचलल्याचं चित्र आहे.

हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला, राणेंच्या विरोधासह पक्षांतर्गत गटबाजीचं आव्हान

त्यासाठी राजन तेली हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा तयारीत आहेत. याबाबत राजन तेली यांनी जाहीरही केलं. मोडकळीस आलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही राजन तेली यांना मदत करण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर एकेकाळी केसरकर यांचा उजवाहात समजले जाणारे बबन साळगावकर यांनीही यावेळी दीपक केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचं जाहीर केलं.

हेही वाचा : हॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढू नये, दीपक केसरकरांचा सल्ला

गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्यावेळी नारायण राणेंसह विरोधकांना धोबीपछाड दिला. त्यामुळे यंदा राणेंच्या निशाण्यावरही दीपक केसरकर आहेत. त्यामुळे सध्या सावंतवाडी मतदारसंघातील राजकारण तापलेलं दिसत आहे. आता दीपक केसरकर इतिहास पुसणार की, राजन तेली त्यांना पराभूत करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.