Video : नारायण राणेंना भर सभेत संरक्षणमंत्र्यांचा फोन, राणे म्हणाले, ‘उन्होंने हवा कर दी सर’

| Updated on: Aug 28, 2021 | 3:19 PM

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नारायण राणे यांना फोन केला. फोन करुन राजनाथ सिंह यांनी राणेंच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी माध्यमांच्या कॅमेरात राणे-राजनाथ सिंह यांचा संवाद कैद झाला.

Video : नारायण राणेंना भर सभेत संरक्षणमंत्र्यांचा फोन, राणे म्हणाले, उन्होंने हवा कर दी सर
राजनाथ सिंह यांचा नारायण राणे यांना फोन
Follow us on

मुंबई : राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा चर्चेचा विषय ठरत आहे. राणे आपल्या वक्तव्यांनी माध्यमांच्या केंद्रस्थानी आहेत. भाजपबरोबर सत्ताधारी महाविकास आघाडी देखील राणेंच्या यात्रेवर लक्ष ठेवून आहे. याचदरम्यान नारायण राणे यांना आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फोन केला. राजनाथ सिंह यांनी फोन करुन राणेंच्या तब्येतीची विचारपूस केली.

माध्यमांच्या कॅमेरात राणे-राजनाथ सिंह यांचा संवाद कैद

नारायण राणे सध्या त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच कोकणात आहेत. एक एक तालुका-गावात जाऊन ते जनतेचा आशीर्वाद घेत आहेत. आज यात्रेदरम्यान नारायण राणे यांना राजनाथ सिंहांचा तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन आला. माध्यमांचे कॅमेरे साहजिक राणेंवर खिळलेले होते. यावेळी माध्यमांच्या कॅमेरात राणे-राजनाथ सिंह यांचा संवाद कैद झाला.

राजनाथ सिंह राणेंना फोन, राणे म्हणाले, ‘उन्होंने हवा कर दी सर’

राजनाथ सिंहांनी तब्येत बरी आहे का विचारल्यावर राणे म्हणाले, “सर मेरी तबियत अच्छी हैं… हॉस्पिटल में नहीं था… घर पर ही था…. तबियत बिगडी है ऐसी उन्होंने हवा कर दी”… यावर राजनाथ सिहांनी तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला तसंच उर्वरित यात्रेसाठी शुभेच्छा देखील दिल्या. सरतेशेवटी राणेंनी राजनाथ सिंह यांचे आभार मानले.

नारायण राणे यांची यात्रा सिंधुदुर्गात पोहोचली

नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज सिंधुदुर्गात पोहोचली आहे. कणकेश्वरमध्ये जन आशीर्वाद आल्यानंतर राणेंचं मंत्रोच्चारात औक्षण करण्यात आलं. राणेंना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून यावेळी प्रार्थना करण्यात आली.

नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गातील कणकेश्वरमध्ये आली. यावेळी मंडपात कणकेश्वराच्या साक्षीने पुरोहितांनी मंत्रपठण करत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. यावेळी राणे कुटुंबासहित विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते आशिष शेलार, प्रमोद जठार आणि रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. या औक्षण कार्यक्रमानंतर राणेंची पुन्हा यात्रा सुरू झाली.

राणेंच्या यात्रेत तुफान बॅनरबाजी, शिवसेनेला टशन

राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचा अंतिम टप्पा तळकोकणात सुरु आहे. शिवसेना (Shiv Sena) आणि राणे समर्थकांच्या राडेबाजीने राणेंची जन आशिर्वाद यात्रा चांगलीच गाजली. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत हाणामारी केल्यांतर, त्याचे पडसाद कोकणातही दिसत आहे. आता राणेंची ही यात्रा देवगडमध्ये जात आहे. मात्र त्याआधी भाजपच्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

देवगड (Devgad) मांजरेकर नाक्क्यावर बॅनर लावले आहेत. या बॅनरवर “ते असताना नाही संपवू शकले, तर ते नसताना काय संपवणार? #दादागिरी”. अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे.

हे ही वाचा :

नारायण राणेंचं कुणकेश्वराच्या साक्षीने औक्षण, उत्तम आरोग्यासाठी मंत्रपठण

Narayan Rane : ते असताना संपवू शकले नाहीत, नसताना काय संपवणार? राणेंच्या यात्रेत पोस्टर