AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayan Rane : ते असताना संपवू शकले नाहीत, नसताना काय संपवणार? राणेंच्या यात्रेत पोस्टर

नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा देवगडमध्ये आज येणार आहे. त्याआधीच हा फलक लावण्यात आला आहे. देवगडमध्ये सध्या हा फलक सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. जामसंडे इथे नारायण राणेंनी भाषण केलं. यावेळी ते म्हणाले, "मोदी यांनी मला केंद्रीय मंत्री बनविले, भारताला मोदी प्रगतीकडे घेऊन जात आहेत. मोदींबदल गर्व आणि अभिमान वाटतो"

Narayan Rane : ते असताना संपवू शकले नाहीत, नसताना काय संपवणार? राणेंच्या यात्रेत पोस्टर
Narayan Rane
| Edited By: | Updated on: Aug 28, 2021 | 2:22 PM
Share

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जन आशिर्वाद यात्रेचा (BJP Jan Ashirwad Yatra) अंतिम टप्पा तळकोकणात सुरु आहे. शिवसेना (Shiv Sena) आणि राणे समर्थकांच्या राडेबाजीने राणेंची जन आशिर्वाद यात्रा चांगलीच गाजली. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत हाणामारी केल्यांतर, त्याचे पडसाद कोकणातही दिसत आहे. आता राणेंची ही यात्रा देवगडमध्ये जात आहे. मात्र त्याआधी भाजपच्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

देवगड (Devgad) मांजरेकर नाक्क्यावर बॅनर लावले आहेत. या बॅनरवर “ते असताना नाही संपवू शकले, तर ते नसताना काय संपवणार? #दादागिरी”. अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे.

नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा देवगडमध्ये आज येणार आहे. त्याआधीच हा फलक लावण्यात आला आहे. देवगडमध्ये सध्या हा फलक सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

देवगडमध्ये पोलीस बंदोबस्त

देवगड शिवसेना शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याठिकाणी काही शिवसैनिक हातात भगवे झेंडे घेऊन उभे आहेत. साधारण 30 ते 40 शिवसैनिक उपस्थित आहे. जामसंडेची सभा झाल्यानंतर याच मार्गावरून नारायण राणे यांची जनाशीर्वाद यात्रा जाणार आहे.

जामसंडे यात्रेत नारायण राणे काय म्हणाले?

दरम्यान, जामसंडे इथे नारायण राणेंनी भाषण केलं. यावेळी ते म्हणाले, “मोदी यांनी मला केंद्रीय मंत्री बनविले, भारताला मोदी प्रगतीकडे घेऊन जात आहेत. मोदींबदल गर्व आणि अभिमान वाटतो”

संजय राऊतांचा हल्लाबोल

नारायण राणे केंद्राचे मंत्री आहेत, त्यांची प्रकृती बरी नसते. अटकेचा प्रसंग आला तेव्हा ते आजारी पडले. मनस्वस्थ बिघडलं आहे. त्यांच्या मुलाने त्यांना त्रास देऊ नये, अशी टोलेबाजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केली. संजय राऊत यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे्य यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणेंना लक्ष्य केलं.

संबंधित बातम्या 

राणेंचं मनस्वास्थ बिघडलंय, त्यांनी विपश्यना करावी; संजय राऊतांचे हल्ले सुरूच

आम्ही सभ्यपणा पाळतोय, कुंडल्या आमच्याकडेही आहेत, संजय राऊतांचं राणेंना उत्तर

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.