AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा निकाल काय?

दिल्ली कँटॉन्मेंट मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेंद्र सिंह यांना अवघी 854 मतं मिळाली. 'आप'ची साथ सोडून सुरेंद्र सिंह राष्ट्रवादीत गेले होते

दिल्ली निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा निकाल काय?
| Updated on: Feb 11, 2020 | 4:39 PM
Share

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 63 जागांवर आघाडी मिळवत भाजपला जोरदार धक्का दिला आहे, तर काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. दिल्ली निवडणुकांच्या रिंगणात राष्ट्रवादीचे पाच उमेदवारही उतरले होते, त्यांनाही पराभवाला सामोरं जावं (Delhi Vidhansabha Election NCP Candidate) लागलं.

‘आम आदमी पक्षा’चा राजीनामा देऊन राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या सुरेंद्र सिंह यांना आमदारकी गमवावी लागली आहे. दिल्ली कँटॉन्मेंट या आपल्याच मतदारसंघातून सुरेंद्र सिंह निवडणूक लढवत होते. मात्र इथे ‘आप’चे वीरेंद्रसिंह कडियान विजयी झाले, तर भाजपचे मनिष सिंह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. कडियान यांना जवळपास 26 हजार, तर मनिष सिंह यांना अंदाजे 17 हजार मतं मिळाली.

दिल्ली कँटॉन्मेंट मतदारसंघात काँग्रेस उमेदवार तिसऱ्या, तर बसप उमेदवार चौथ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादीचे सुरेंद्र सिंह यांना अवघी 854 मतं मिळाली. विद्यमान आमदाराला जनतेने नाकारल्यामुळे उमेदवारापेक्षा पक्षाला प्राधान्य दिल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांचे निकाल (Delhi Vidhansabha Election NCP Candidate)

गोकुलपूर – सुरेंद्र कुमार (आप) – 88 हजार 90 मतं, रणजीत सिंह (भाजप) 68 हजार 575 मतं, सातव्या क्रमांकावर फतेह सिंह (राष्ट्रवादी) – 418 मतं, ‘नोटा’ला अधिक मतं – 449

बाबरपूर – गोपाल राय (आप) – 58 हजार 827 मतं, नरेश गौर (भाजप) – 35 हजार 564 मतं, सहाव्या क्रमांकावर झाहिद अली (राष्ट्रवादी) – 100 मतं, ‘नोटा’ला अधिक मतं – 211

छत्तरपूर – कर्तार सिंह तन्वर – 66 हजार 451 मतं, ब्रह्म सिंह तन्वर – 663 हजार 13 मतं, आठव्या क्रमांकावर राणा सुजीत सिंह (राष्ट्रवादी) – 171 मतं, ‘नोटा’ला अधिक मतं – 637

मुस्तफाबाद – हाजी युनूस (आप) – 98 हजार 681 मतं, जगदीश प्रधान (भाजप) – 77 हजार 845 मतं, पाचव्या क्रमांकावर मयुर भान 288 मतं, ‘नोटा’ला अधिक मतं – 459

Delhi Vidhansabha Election NCP Candidate

संबंधित बातम्या :

भाजप देशावरची आपत्ती, पराभवाची मालिका सुरु : शरद पवार

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.