पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का, भाजपच्या ताब्यातील डीसीसी बँकेवर कारवाई

छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती सन्मान योजनेअंतर्गत निधीचा अपहार केल्याप्रकरणी बीडच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (डीसीसी) अध्यक्षांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का, भाजपच्या ताब्यातील डीसीसी बँकेवर कारवाई

बीड : छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती सन्मान योजनेअंतर्गत निधीचा अपहार केल्याप्रकरणी बीडच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (डीसीसी) अध्यक्षांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. लातूरच्या सह उपनिबंधकांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. डीसीसी बँक (action on DCC bank president Beed)  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे. या कारवाईच्या आदेशाने पंकजा मुंडेंना धक्का मानला (action on DCC bank president Beed) जात आहे.

शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट यांनी लातूरच्या सहनिबंधकांकडे डीसीसी बँकेत कर्जप्रकरणी अनियमितता झाल्याची तक्रार केली. त्यानुसार सहनिबंधकांनी डीसीसी बँकेचे अध्यक्ष आणि सीईओ आदित्य सारडा यांच्यावर कारवाईचे आदेश काढल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

“या प्रकरणात आमचा काहीही संबंध नसून बँकेच्या नियमाप्रमाणेच आम्ही आर्थिक व्यवहार केले आहेत. कायदेशीर सल्ल्यानुसार आम्ही योग्य निर्णय घेऊ”, असे सांगत आदित्य सारडा यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.

वर्ष 2017 मध्ये मागणी करूनही बँकेने छत्रपती शिवाजी महाराज किसान कर्ज मुक्ती सन्मान योजनेअंतर्गत आलेला निधी परस्पर खात्यात वर्ग केला नव्हता. हा निधी बँकेने कर्ज स्वरूपात फिरवला, अशी तक्रार शेतकरी नेते कालिदास आपेट यांनी केली होती. आपेट यांच्या तक्रारीची दखल घेत लातूरच्या सहउपनिबंधकांनी बँकेला नोटीस पाठवून कारवाई केल्याचे कळविले. सहनिबंधकाच्या या कारवाईचे शेतकरी संघटनेने स्वागत केले आहे.

पंकज मुंडेंनी 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर सर्वात आधी डीसीसी बँकेचे पुनरुज्जीवन कले. यापूर्वी डीसीसी बँक बुडते जहाज होती. मात्र पंकजा मुंडे यांनी संचालक मंडळ बदलून पुन्हा एकदा या बँकेला नवसंजीवनी दिली. पाच वर्षात तब्बल चारशे वीस कोटी रुपयांची ठेवी देखील ग्राहकांना परत करत एक नवीन विक्रम नोंदवण्यात आला. मात्र आता अचानक 2017 नुसार बँकेवर कारवाई झाल्याने जिल्ह्यात तर्कवितर्कांना ऊत आला आहे. सत्ता गेल्याने पंकजा मुंडेंवर ही कारवाई तर होत नसावी ना..? असा सवालही यावेळी उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याने त्या पक्षावर नाराज आहेत. तसेच ते पक्षही सोडणार असल्याच्या चर्चा मागे सुरु होत्या. नुकतेच त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर निशाणाही साधला होता. त्यामुळेच ही कारवाई झाली असावी, असं बोललं जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *