‘अरे नालायकांनो राजकारण करायचं तेवढं करा, मात्र…’, देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

"आज काँग्रेसचे लोक म्हणतात की, करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला नाही. अरे नालायकांनो राजकारण करायचं तेवढं करा. मात्र शहीदांवर असे बोलू नका", असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

'अरे नालायकांनो राजकारण करायचं तेवढं करा, मात्र...', देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 10:12 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सभा पार पडली. या सभेत त्यांनी मोठा दावा केला. “महाराष्ट्रात 4 चरणातील निवडणूक आता पूर्ण झालीय. आता शेवट 20 तारखेला होणार आहे. आता मुंबईच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. मी तुम्हाला खुशखबरी देऊ इच्छितो की, पहिल्या चार टप्प्यातच महाविकस आघाडी आणि इंडीया आघाडीचा सुपडा साफ केलाय”, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोलदेखील केला. “हा सर्व परिसर म्हाडाचा आहे. इथे आपण म्हाडा सेवाशुल्क माफ केलाय. एफएसआयच्या धोरणात आपण बदल केला. येथील वसाहतींच्या पुनर्विकासात सुलभता आणली. याठिकाणी आपण अनेक अडथळे दूर केले”, असंदेखील देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“आपला प्रयत्न आहे, सामान्य मुंबईकरांना घर मिळालं पाहिजे. आज ज्यांनी २५ वर्ष मुंबईवर राज्य केले त्यांना प्रश्न आहे, त्यांनी २५ वर्षात जो मुंबईकर राहतो त्याचे स्वप्न पूर्ण करू शकले नाही. मुंबईतील जवळपास १४ हजार बिल्डिंगच्या विकास करण्याचे आपण कायदा केला. २०१४ नंतर आपण मुंबई मध्ये मेट्रोचे नेटवर्क आपण तयार केले. सांडपाण्यावर प्रक्रिया होत नव्हती. ते तसंच समुद्रात जायचं. आपण त्यावर प्रक्रिया केली. ही गल्लीची निवडणूक नाही. साधी निवडणूक नाही. इथे आपल्याला देशाचे पंतप्रधान निवडायचे आहेत. आता महाभारत सारखी परिस्थिती झाली आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘अरे नालायकांनो राजकारण करायचं तेवढं करा, मात्र…’

“पूर्वी भारतात सातत्याने बॉम्बस्फोट केले. मात्र तेव्हा सरकार फक्त निषेध करायचे. कसाब आला तेव्हा पंतप्रधान अमेरिकाकडे गेले आणि आमच्याकडे पुरावे आहेत, असे म्हणाले. आता तुम्ही त्यांना रागवा. आता मोदींनी नवा भारत तयार केला आहे. दहशतवाद्यांना घरात घुसून एअर स्ट्राईक केलं. आज काँग्रेसचे लोक म्हणतात की, करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला नाही. अरे नालायकांनो राजकारण करायचं तेवढं करा. मात्र शहीदांवर असे बोलू नका. उज्ज्वल निकम यांनी कसाबला शिक्षा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आज काँग्रेसचा पंजा कसाबसोबत आहे, आणि उज्ज्वल निकम महायुतीसोबत आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘त्यांच्याकडे फक्त राहुल गांधींचं इंजिन’

“आपल्याला आपल्या मतांच्या मदतीने फैसला करायचा आहे. मी विरोधकांना म्हटलं तुमचे नेते कोण? यदाकदाचित तुमचं सरकार निवडून दिले जनतेने तर तुमचा नेता कोण? तर त्यांचा पोपटलाल म्हणतो की, आम्ही ५ निवडू, मला असं वाटतं हे संगीत खुर्ची खेळून पंतप्रधान निवडतील. अरे ही काय घंटा खुर्चीची निवडणूक नाही. तिकडे कोण आहे? फक्त इंजिन आहे. मनसेचं नाही. हा मनसे आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडे फक्त राहुल गांधींचं इंजिन आहे. मात्र इंजिनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसते”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“मी तुम्हाला आठवण करून देतो. आठवा तो कोविडचा काळ, नातेवाईक सुद्धा जवळ करत नव्हते. तेव्हा जग म्हणायचे की, भारतात एवढी संख्या आहे. भारत काही वाचत नाही. मात्र मोदींनी लस बनवून दिली. १४० कोटी जनतेला मोदींनी लस बाणवून दिली. मोफत पोहचली. मोदीजी त्यावेळी देश वाचवत होते. तेव्हा मुंबईतील सत्ताधारी काय करत होते? तर मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणे”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

‘आम्ही देना बँक आहोत’

“मंगेश जी तुम्ही ज्या मागण्या केल्या त्या मी कागदावर लिहिल्या होत्या मात्र तो उडून गेला, मात्र तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ज्या मागण्या केल्या त्या मी मनात ठेवल्या, निवडणुकांनंतर एका बैठकीत मागण्या पूर्ण होतील, एकनाथ शिंदे आणि आम्ही देना बँक आहोत, लेना बँक कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.