दशरथ दादा चहावाला, देवेंद्र फडणवीसांचा नीरा नरसिंहपूरचा अनोखा मित्र!

दर्शनानंतर फडणवीस मंदिरातून बाहेर पडताना नेहमीप्रमाणे नृसिंह मंदिराबाहेर असलेल्या दशरथ राऊत यांच्या चहाच्या दुकानात थांबले.

दशरथ दादा चहावाला, देवेंद्र फडणवीसांचा नीरा नरसिंहपूरचा अनोखा मित्र!

पुणे : मैत्रीमध्ये गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा भेद नसतो. कृष्णा-सुदामापासून शोले चित्रपटातील जय-विरू अशा अनेकांच्या मैत्रीचे किस्से आपण ऐकत असतो. अशीच मैत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीरा नरसिंहपूर इथल्या चहावाल्याची चर्चेचा (Devendra Fadnavis friend) विषय आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे न चुकता या चहावाल्याचा चहा प्यायल्याशिवाय जात नाहीत. (Devendra Fadnavis friend)

देवेंद्र फडणवीस हे नगरसेवकपदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारलेलं व्यक्तिमत्व. राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांनी विविध पदे भूषवली. आता ते राज्याच्या विरोधी पक्षनेते पदावर विराजमान झाले आहेत. मात्र त्यांचे जुन्या काळापासून असलेले ऋणानुबंध आजही कायम असल्याचं दिसतं. इंदापूर तालुक्यातल्या नीरा नरसिंहपूर या गावी असलेलं श्री लक्ष्मी नृसिंह हे फडणवीस कुटुंबियांचं कुलदैवत. वर्षातून एकदा तरी फडणवीस कुटुंबीय या मंदिरात दर्शनासाठी येतात. काल टेंभुर्णी येथील विवाह सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी कुलदैवताचं दर्शन घेतलं.

दर्शनानंतर फडणवीस मंदिरातून बाहेर पडताना नेहमीप्रमाणे नृसिंह मंदिराबाहेर असलेल्या दशरथ राऊत यांच्या चहाच्या दुकानात थांबले. राऊत यांनी आग्रहानं देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत आलेल्या मान्यवरांना चहा पाजला.  देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा कुलदैवताच्या दर्शनाला येतात तेव्हा तेव्हा दशरथ राऊत यांच्याकडे पाच मिनिटांसाठी का होईना थांबतातच. त्यामुळंच राऊत हे फडणवीस यांच्याबद्दल भरभरून बोलतात.

कुलदैवताला नेहमीच ये-जा करत असल्यानं दशरथ राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांसोबत परिचय झाला. मंदिरासमोर राऊत यांचा चहाचा गाडा आहे. तेव्हापासून आजतागायत फडणवीस आणि राऊत यांच्यात एक प्रकारे जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं आहे. त्यामुळंच देवेंद्र फडणवीस हे वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असले तरी त्यांनी राऊत यांचा चहा पिणे सोडलेलं नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI