बिहारमध्ये फडणवीसांमुळे चमत्कार झाला; शरद पवारांच्या ‘त्या’ खोचक टिप्पणीला फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले..

पवारसाहेब मोठे नेते आहेत. मी लहान नेता आहे. मला पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात संधी मिळाली. | Devendra Fadnavis

बिहारमध्ये फडणवीसांमुळे चमत्कार झाला; शरद पवारांच्या 'त्या' खोचक टिप्पणीला फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले..
15 तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते.
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 1:25 PM

मुंबई: शरद पवार हे मोठे नेते आहेत. मी लहान नेता आहे. मला पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर राजकारणाची संधी मिळाली. मी ती जबाबदारी एका पातळीपर्यंत चोखपणे पार पाडली, याबद्दल मी समाधानी आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. यंदा भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. (Devendra fadnavis on Bihar Election results 2020)

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मंगळवारी निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला होता. देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला, अशी मिष्किल टिप्पणी त्यांनी केली होती. शरद पवार यांच्या खोचक टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना प्रत्युत्तर दिले. पवारसाहेब मोठे नेते आहेत. मी लहान नेता आहे. मला पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात संधी मिळाली. मला जे करता येईल ते मी केले. मात्र, खऱ्या लढाईच्यावेळी मी आजारी पडलो. पण मला शक्य असणाऱ्या सर्व गोष्टी मी केल्या. मी ही लढाई वरच्या टप्प्यात नेऊन ठेवली, याचा मला आनंद असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

‘शिवसेना आणि राष्ट्रवादीने मोठा आव आणला, पण बिहारच्या मतदारांना जागा दाखवली’ बिहारच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या झालेल्या दारुण पराभवाविषयी देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. आम्ही तेजस्वी यादव यांना मोकळीक देण्यासाठी ताकदीने निवडणूक लढवलीच नाही, असे शरद पवार म्हणतात. पण शेवटी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पक्षांमध्ये फरक असतो. प्रादेशिक पक्षांना मर्यादा असतात. मात्र, तरीही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा आव आणून ही निवडणूक लढवली. मात्र, बिहारच्या जनतेने त्यांना जागा दाखवून दिली, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महिला मतदारांमुळे बिहारच्या एक्झिट पोल्सचे अंदाज चुकले, देवेंद्र फडणवीसांचे निरीक्षण बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Vidhansabha Election) महिलांनी सर्वाधिक मतदान केलं. जे बोलत नाहीत, पण मतदान करतात, त्यामुळेच एक्झिट पोल (Bihar Exit Polls) चुकतात, असं निरीक्षण विरोधीपक्ष नेते आणि बिहारचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नोंदवले.

मला वाटतं की एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वासाची ही लाट आहे. याचं कारण मी बिहारमध्ये बघितलं 15 वर्षांचं सरकार होतं. अँटी इन्कम्बन्सी असते. पण मोदींबाबत प्रो इन्कम्बन्सी होती. लॉकडाऊनमध्ये बिहारमध्ये गेलेल्या मजुरांची नीट सोय झाली, बिहारमध्ये पूर आला, त्यांनाही मदत केली. लोकांना वाटलं आपल्या पाठीशी उभं राहणारे मोदीजी आहेत. त्याचाच भाग म्हणून मोदींवर विश्वास टाकण्यात आला आणि मतात रुपांतर झाले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला, शरद पवारांची मिष्किल टिप्पणी

Bihar Election: निवडणूक हारणे हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो: शिवसेना

बिहारमध्ये शिवसेनेचं डिपॉझिटच जप्त; आता कुठे गेला उद्धव ठाकरे आणि राऊतांचा चमत्कार: किरीट सोमय्या

(Devendra fadnavis on Bihar Election results 2020)

Non Stop LIVE Update
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.