ना सुरक्षा रक्षक, ना सहकारी, राज-फडणवीस गुप्त भेट, राज ठाकरे मागच्या दाराने, फडणवीस पुढील दाराने रवाना!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis meet Raj Thackeray) यांची आज गुप्त भेट झाली.

ना सुरक्षा रक्षक, ना सहकारी, राज-फडणवीस गुप्त भेट,  राज ठाकरे मागच्या दाराने, फडणवीस पुढील दाराने रवाना!
Follow us
| Updated on: Jan 07, 2020 | 7:48 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ मोठ्या घडामोडींचं सत्र सुरुच आहे. आजही अशीच मोठी घडामोड घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis meet Raj Thackeray) यांची आज गुप्त भेट झाली. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही वाच्यता न करता दोन्ही नेत्यांनी अत्यंत गोपनियता बाळगत चर्चा केली. प्रभादेवी येथील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये (Devendra Fadnavis meet Raj Thackeray) जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली.

महत्त्वाचं म्हणजे या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे पुढील दाराने, तर राज ठाकरे मागील दाराने बाहेर पडले. टीव्ही 9 मराठीच्या कॅमेऱ्यात ही दृश्यं कैद झाली आहेत.

या बैठकीसाठी अत्यंत गोपनियता बाळगण्यात आली होती. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मित्र गुरुप्रसाद रेगे हे या बैठकीला उपस्थित होते.

महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे या बैठकीसाठी कोणत्याही सुरक्षा रक्षकाशिवाय आले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकीबाबत मोठी गोपनीयता बाळगली होती. या भेटीनंतर राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मित्र गुरुप्रसाद रेगे हे देवेंद्र फडणवीस यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी खाली आले.

नव्या युतीचे संकेत

शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने, आता मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून तशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. मनसेचं येत्या 23 जानेवारीला महाअधिवेशन होणार आहे. मनसेच्या कारकिर्दीतील हे पहिलं अधिवेशन आहे. या अधिवेशनात राज ठाकरे कोणती भूमिका जाहीर करणार याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलं आहे.

राजकारणात काहीह होऊ शकतं

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो, हे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या निमित्ताने पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही दिवसांपूर्वी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र येत असतील तर राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हटलं होतं. त्यामुळे आता मनसे आणि भाजप हे सुद्धा एकत्र येणार का आणि राजकारणात काहीही होऊ शकतं याची पुन्हा एकदा प्रचिती येणार का हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या 

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युतीचे संकेत

Non Stop LIVE Update
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.