Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र ‘फर्नांडिस’! बंडखोरांचा भाईंदरमध्ये बॅनरबाजीत ‘प्रताप’, नावातच केला मोठा घोळ

सिद्धेश सावंत

|

Updated on: Jul 07, 2022 | 6:56 AM

Devendra Fernandes Poster News : एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता.

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र 'फर्नांडिस'! बंडखोरांचा भाईंदरमध्ये बॅनरबाजीत 'प्रताप', नावातच केला मोठा घोळ
चकीत करणारं पोस्टर...
Image Credit source: TV9 Marathi

मुंबई : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी (Deputy CM Devendra Fadnavis) विराजमान झाले. त्यानंतर अनेकांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकावले. संपूर्ण राज्यभरात देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदनपर पोस्टर लावण्यात आले होते. अशातच मीरा भाईंदरमध्ये भाजप समर्थकांनीही बॅनरबाजी केली होती. पण ही बॅनरबाजी चांगलीच चर्चेत आली आहे. कारण या बॅनरमध्ये (Devendra Fadnavis News) देवेंद्र फडणवीस यांचं नाव छापतानाच मोठा घोळ झाला. मीरा रोडच्या शांतीनगर येथील जैन मंदिर परिसरात लावलेला बा बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फर्नांडिस (Devendra Fernandes Poster) असा करण्यात आला होता. स्वीकृत नगरसेवक विक्रम प्रतापसिंह यांनी फडणवीसांना शुभेच्छा देताना त्यांचं आडनाव फडणवीस ऐवजी फर्नांडिस केल्यानं हा बॅनर चर्चेचा विषय ठरलाय.

मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता ते उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी 2019 नंतर 80 तास मुख्यमंत्रीपद सांभाळलं, त्यानंतर महाविकास आघाडी सरकार उदयाला आला. मागच्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेते पद भूषवलं. त्यानंतर आता बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असतील, ही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियातून निशाणा

मीम्समधून टोला

चर्चांना उधाण

सोशल मीडियातही भाईंदरचा हा बॅनर आता चर्चेत आला आहे. अनेकांनी या बॅनरवरुन देवेंद्र फडणवीस आणि भाजप समर्थकांवर निशाणा साधलाय. प्रताप फाऊंदेशन परिवार यांच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला होता. विक्रम प्रतापस सिंह हे तिथले स्थानिक नगरसेवक आहेत. या बॅनरमधून एकनाथ शिंदे यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI