भाजपचं उपरणं शिंदे समर्थक आमदाराच्या गळ्यात?

शिंदे गटाचे आमदार नरेंद्र बोंडेकरांच्या गळ्यात भाजपाचं उपरणं पहायला मिळालं. त्यांनी भंडाऱ्यामध्ये भाजपाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावली.

भाजपचं उपरणं शिंदे समर्थक आमदाराच्या गळ्यात?
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 1:15 PM

भंडारा : शिंदे गटाचे आमदार नरेंद्र बोंडेकरांच्या (Narendra Bondekar) गळ्यात भाजपाचं उपरणं पहायला मिळालं. त्यांनी भंडाऱ्यामध्ये (Bhandara) भाजपाच्या (BJP) वतीने आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. शिंदे समर्थक आमदार  नरेंद्र बोंडेकर आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी नरेंद्र बोंडेकर यांनी भाजपाचे उपरणे परिधान केले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमात  बोंडेकरांचे  कौतुक केले. यानंतर आता राजकीय चर्चेला उधान आले आहे.

फडणवीसांचा लोकप्रतिनिधींवर निशाणा

दरम्यान यावेळी बोलताना फडणवीसांनी लोकप्रतिनिधींचे चांगलेच कान टोचले आहेत. काही लोकप्रतिनिधी स्वत:ला मालक समजतात, मात्र लोकप्रतिनिधी हे प्रत्यक्षात जनतेचे सेवक असतात. लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर लेखाजोखा मांडाण्याची गरज असते असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘जिल्ह्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही’

या कार्यक्रमात बोलताना पुढे फडणवीस यांनी म्हटलं आहे की, भंडारा -गोंदियासाठी निधी कमी पडू देणार नाही. भंडाऱ्यातील विकास कामे मार्गी लावले जातील. भंडारा -गोंदियात पर्यटन वाढवण्याचा सरकाराच प्रयत्न आहे. शेतकऱ्यांसोबत होणारी बेमाई आमचं सरकार कदापी सहन करणार नाही, भंडारा जिल्हयात धान हे मुख्य पीक आहे. शेतकऱ्यांचं धान खरेदी झालं पाहिजे. ते नुसतं खरेदीचं करायचं नाही तर ते वेळेत खरेदी झालं पाहिजे असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांच्या नावाने जे व्यापारी धान विक्री करतात त्यांना देखील आळा घालण्यासाठी पाऊले उचलणार असल्याचं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच धान खेरदी करणाऱ्या बोगस संस्थांवर कारवाईचा इशारा देखील यावेळी फडणवीस यांनी दिला आहे.

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.