आम्ही एक तरी जिंकलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही : देवेंद्र फडणवीस

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असल्याची प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे

आम्ही एक तरी जिंकलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 12:04 PM

मुंबई : राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह (Aurangabad) हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर (graduate-teacher constituency election results) मतदारसंघही गमवावा लागला आहे. पदवीधरच्या या तिन्ही मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरलाय. विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला आहे. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती, पण एकच जागा मिळाली. या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर भाजप नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. परंतु आमच्या स्ट्रॅटेजीत चूक झाली असेल. तसेच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं. आता आम्हाला त्यांची ताकद समजली आहे. त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू”. (Devendra Fadnavis slams ShivSena for not winning single graduate-teacher constituency election)

फडणवीस म्हणाले की, “ही निवडणूक अचानक लागली, त्यामुळे अनेक ठिकाणी नोंदणी राहिली. आम्ही मतदारांची नोंदणी करण्यात कमी पडलो. माझ्या घरची, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरची चार नावं नाहीत. तरीदेखील जे निवडणूक जिंकले आहेत त्यांना शुभेच्छा. एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटतेय, ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा निवडून आली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना फायदा झाला आहे. या निकालांनंतर जसं आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे, तसंच ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा येत नाही, त्यामुळे त्यांनीही आत्मचिंतन करावं”.

अरुण लाड यांना विजयी गुलाल

पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना धूळ चारत विजय मिळवला आहे. अरुण लाड यांना 1लाख 22 हजार 145 मतं मिळाली आहेत. तर भाजपचे संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मतांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे अरुण लाड यांनी देशमुखांवर तब्बल 48 हजार 824 मतांनी विजय मिळवला आहे.

बालेकिल्ल्यातही भाजपला धक्का

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील प्रतिनिधीत्व केलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडी पर्यायानं काँग्रेसचे उमेदवार अभिजत वंजारी यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. मात्र, विजयी होण्याचा कोटा असलेली 60 हजार 747 मतं त्यांना मिळाली नाहीत. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु झाली आहे.

पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये अभिजित वंजारी यांना 55 हजार 947 मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 41 हजार 540 मतांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे अभिजित वंजारी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा मानला जात असताना, अभिजित वंजारी यांचा विजय हा विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का मानला जात आहे.

हिंमत असेल तर एकटे लढा- चंद्रकांत पाटील

पुणे आणि नागपूर पदवीधरची जागा गमावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केलं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचं खच्चीकरण झालंय. तर राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली आहे, असं वक्तव्य करत त्यांनी शिवसेनेला एकप्रकारे सूचक इशाराच दिलाय. तर पुण्यात आणि नागपुरात अपक्ष उमेदवाराने अजून काही मतं घेतली असती तर विजय आमचाच होता, असं म्हणत पाटील यांनी आपला पराभव मान्य केला आहे.

संबंधित बातम्या

चंद्रकांतदादांमुळे माझा विजय सोपा, पुणे पदवीधर मतदारसंघ खेचून आणताच राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांचा टोला

जिथे चंद्रकांत पाटील सलग जिंकले, तिथे संग्राम देशमुख कसे हरले?

धुळे-नंदुरबारच्या निकालाचं आश्चर्य नाही, पुणे-नागपूरचे निकाल म्हणजे महाविकास आघाडीला लोकांचा पाठिंबा- शरद पवार

(Devendra Fadnavis slams ShivSena for not winning single graduate-teacher constituency election )

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.