राज ठाकरेंची मराठी माणसाबद्दलची भूमिका मान्य, पण आमचं हिंदुत्व व्यापक : देवेंद्र फडणवीस

"आम्ही व्यापक हिंदुत्ववादी आहोत. या देशाची संस्कृती जे आपली मानतात अशा सर्व लोकांना आम्ही हिंदुत्वाच्या व्याख्यात घेतलं आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis statement on MNS alliance).

राज ठाकरेंची मराठी माणसाबद्दलची भूमिका मान्य, पण आमचं हिंदुत्व व्यापक : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 7:43 PM

मुंबई : “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका भाजपला पूरक ठरेल का किंवा त्यांना सोबत घेतल्यास फायदा होईल का? हे आज सांगता येणार नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आमची व्यापक भूमिका आहे. राज ठाकरे यांची मराठी माणसाकरता जी भूमिका आहे ती आम्हाला मान्यच आहे. पण त्याचवेळी आमचं अगदी स्पष्ट मत आहे, मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या हक्काकरता लढलंच पाहिजे. पण त्याच्या हक्काकरता लढणे म्हणजे अमराठी माणसाला वाळीत टाकणे, त्यांच्यावर हल्ले करणं हे आम्हाला मान्य नाही”, अशी भूमिका भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना मांडली (Devendra Fadnavis statement on MNS alliance).

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे मनसे आणि भाजप एकत्र येईल का? असा सवाल भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं Devendra (Fadnavis statement on MNS alliance).

“आमच्यासोबत काही छोटे मित्र आहेत. त्या व्यतिरिक्त कुणासोबत जायचं याबाबत आम्ही निर्णय घेतलेला नाही. त्याबाबत आमची चर्चाही झालेली नाही. हिंदुत्वाचा विचार कुणी मांडत असेल तर त्याचं आकलन निश्चितपणे करता येईल. पण आजतरी आम्ही ते केलेलं नाही. सध्या तरी आमचे जे छोटे मित्र आहेत त्यांच्या भरोशावरच आम्हाला निवडणूक लढवायची आहे”, असं फडणवीस यांनी सांगितलं.

“आम्ही व्यापक हिंदुत्ववादी आहोत. या देशाची संस्कृती जे आपली मानतात अशा सर्व लोकांना आम्ही हिंदुत्वाच्या व्याख्यात घेतलं आहे. कुणाची व्याख्या आमच्या व्याख्याशी जुळली तर त्यांना सोबत घ्यायला आम्हाला हरकत नाही. पण आजतरी आम्ही लक्ष ठेवून आहोत”, असं फडणवीस म्हणाले.

“वाद आम्हाला मान्य नाही. मराठी माणसाच्या हक्काकरता आम्हीदेखील शेवटपर्यंत लढू. पण त्यासोबत अमराठी माणसावर अन्याय करणं म्हणजे मराठी माणसाकरता लढणं असं आमचं मत नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातमी : पवारांचा कृषी कायद्यांच्या मूलतत्त्वांना विरोध नाही, काही जण वाहत्या गंगेत हात धुतायत : देवेंद्र फडणवीस

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.