पवारांचा कृषी कायद्यांच्या मूलतत्त्वांना विरोध नाही, काही जण वाहत्या गंगेत हात धुतायत : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी कृषी कायदे समजून घेण्याची गरज असल्याचा टोला लगावला आहे. Devendra Fadnavis criticize congress

पवारांचा कृषी कायद्यांच्या मूलतत्त्वांना विरोध नाही, काही जण वाहत्या गंगेत हात धुतायत : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 6:07 PM

रायगड : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी कृषी कायदे समजून घेण्याची गरज असल्याचा टोला लगावला आहे. पंजाब आणि हरियाणा शिवाय इतरत्र कुठेही आंदोलन झाले नाही. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी ट्रॅक्टर चालवण्याशिवाय केलं नाही. शेतकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. काही जण समजून घेऊनही झोपल्याचं सोंग करुन शेतकऱ्यांच्या फायद्याच्या कायद्यांना विरोध करत आहेत, असंही फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis criticize congress leaders over Agriculture Act)

कृषी कायद्यात ज्या बाबाी आहेत त्यावर महाराष्ट्रात अगोदरच कायदे झाले आहेत. कृषी कायद्यांच्या अध्यादेशांच्या अंमलबजावणीचे आदेश काढणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. कृषी कायदा हा शेतक-यांच्या फायद्याचे आहेत.ज्यांचे हितसंबंध अडचणीत ते शेतक-यांना दिशाभूल करताहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला केला आहे. (Devendra Fadnavis criticize congress leaders over Agriculture Act)

शरद पवार यांची द्विधा मनस्थिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर कृषी कायद्यांचं समर्थन करावं की विरोध करावा, असा यक्षप्रश्न आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांच्या आधारे हे कायदे करण्यात आले आहेत. त्यांनी कृषी कायद्यांच्या मूळ तत्वांना विरोध केलेला नाही. ते कधी त्याच्यावर बोलत नाहीत. मात्र, वाहत्या गंगेत अनेक जण हात धुत आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis criticize congress leaders over Agriculture Act)

शेतकरी आंदोलकांच्यामध्ये काही गट असून त्यांना आंदोलन सुरु ठेवायचं आहे. त्यांना आंदोलनावर तोडगा काढायचा नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

भाजपला भविष्यात पूर्ण स्पेस मिळणार

आगामी निवडणुकांसाठी आम्ही सावध राहणार आहोत. तीन पक्षांची आघाडी असल्यानं त्यांच्या ताकदीचं आकलन करण्यास कमी पडलो. विधानपरिषद निवडणुकीत अतिआत्मविश्वास होता. मात्र, आगामी काळात भविष्यात पूर्ण स्पेस मिळेल. आमचे छोटे मित्रपक्ष आमच्या सोबत असतील, असंही ते म्हणाले.(Devendra Fadnavis criticize congress leaders over Agriculture Act)

मनसेसोबत घ्यायचा विचार आणि चर्चाही झालेली नाही, मात्र, मनसेचा मराठीच्या मुद्याला पाठिंबा आहे. आगामी काळात मनसेनी अमराठी मुद्दा बदल्यास विचार करू, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रातील आम्ही सरकार पाडणार नाही, सरकार पडलं तर पर्यायी सरकार देऊ, सरकार पाडण्याचा कुठलाही प्लॅन नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

दोन दिवसांचं अधिवेशन म्हणजे चर्चेपासून पळ, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्ला

उद्धवजी, ‘त्या’ दोन निर्णयांबद्दल तुमचं जाहीर अभिनंदन : देवेंद्र फडणवीस

तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून आम्ही महाराष्ट्रद्रोही काय? देवेंद्र फडणवीसांचा शिवसेना नेत्यांवर हल्लाबोल

(Devendra Fadnavis criticize congress leaders over Agriculture Act)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.