Devendra Fadnavis : ‘मविआ’ हे बेईमानीचे सरकार, फडणवीसांनी सांगितला दोन्ही सरकारमधला फरक

विरोधकांनी आमची चिंता करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्यामधील एकीची चिंता केली पाहिजे. कारण तीन पक्षाच्या तीन वेगळ्या दिशा पाहायला मिळत आहेत. विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याची निवड आम्हाला न विचारता केली असं काँग्रेस नेते बोलले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. सत्तेत असतानाही तीन पक्षामध्ये एकी नव्हती आता विरोधी पक्षात गरज असतानाही एकी दिसत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.

Devendra Fadnavis : 'मविआ' हे बेईमानीचे सरकार, फडणवीसांनी सांगितला दोन्ही सरकारमधला फरक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 7:59 PM

मुंबई : पावसाळी अधिवेशनाला 17 ऑगस्टपासून सुरवात होत आहे. त्याअनुशंगाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद पार पडली असून अधिवेशाच्या पूर्वसंध्येला (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांनी (MVA) महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी दोन्ही सरकारमधील फरकच स्पष्ट करुन सांगितला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकी नव्हतीच तर जनतेच्या हिताचे निर्णय हे लांबच राहिले आहेत. केवळ शेतकऱ्यांच्याच बाबतीत मविआ हे बेईमानीचे सरकार नव्हते तर सर्वच क्षेत्रासाठी ते सरकार नुकसानीचे होते असा घणाघात करीत फडणवीस यांनी अनेक उदाहरणे समोर दिली आहेत. तर (Assembly Elections) विधानसभा निवडणुकीत एकत्रित येऊन मतं मागितली होती ते दोन पक्ष मिळून आज सरकार स्थापन झालं आहे. महाविकास आघाडीचं सरकार बेईमानीनं आलं होतं. जनतेचा कल डालवून ते सरकार स्थापन झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

विरोधकांमध्ये एकी नाही

विरोधकांनी आमची चिंता करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्यामधील एकीची चिंता केली पाहिजे. कारण तीन पक्षाच्या तीन वेगळ्या दिशा पाहायला मिळत आहेत. विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याची निवड आम्हाला न विचारता केली असं काँग्रेस नेते बोलले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. सत्तेत असतानाही तीन पक्षामध्ये एकी नव्हती आता विरोधी पक्षात गरज असतानाही एकी दिसत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. आधी मंत्रालय, सह्याद्री, मंत्र्यांचे बंगले रिकामे होते, आता इथे पाय ठेवायला जागा नाही. मुख्यमंत्री मी आमचे नेते मैदानात आहेत असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.

पंचनाम्यातील तक्रारीही दूर होणार

मागच्या सरकारनं जाहीर केलेली मदत आणि मिळालेली मदत यात 9 महिन्याचं अंतर होतं. आमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निर्णय घेतला. पुरवणी मागण्या झाल्यानंतर आम्ही मदत द्यायला सुरुवात करु. आम्ही आताही मदत देऊ शकतो. पण 95 टक्के पंचनामे झाले आहेत. 5 टक्के बाकी आहेत. तर काही ठिकाणी पंचनाम्याबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

निर्णयाला स्थगिती नाही तर तपासणी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही याचा पुन्नउच्चार फडणवीस यांनी केला आहे. आम्ही कुठल्याही निर्णयाला स्थगिती दिली नाही. आम्ही पुनरावलोकन करत आहोत. कारण 100 रुपये गरज आहे तिथे 500 रुपये वाटले गेले आहेत. त्यामुळे आम्ही त्याची माहिती घेत आहोत. कुठल्या पक्षाचं सरकार होतं याचा विचार न करता जनतेच्या हिताचे निर्णय हे सरकार घेत असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.