AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मन:शांतीचा निर्णय! धनंजय मुंडे नाशिकमध्ये नेमकं काय करतायत? महत्त्वाची माहिती समोर!

माजी मंत्री धनंजय मुंडे हे विपश्यना केंद्रात ध्यानधारना करत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. सध्या ते नाशिकच्या विपश्यना केंद्रात आहेत.

आता मन:शांतीचा निर्णय! धनंजय मुंडे नाशिकमध्ये नेमकं काय करतायत? महत्त्वाची माहिती समोर!
| Updated on: May 29, 2025 | 9:22 PM
Share

Dhananjay Munde : आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे फारसे चर्चेत नाहीयेत. संतोष देशमुख यांच्या हत्येत त्यांच्या जवळची व्यक्ती वाल्मिक कराड याचे नाव आल्याने त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. याच काळात मुंडे यांना आरोग्यविषयक समस्यांनाही तोंड द्यावे लागले. त्यांना बेल्स पाल्सी हा दुर्मिळ आजार झाला आहे. असे असतानाच आता धनंजय मुंडे हे नाशिकच्या विपश्यना केंद्रात विपश्यना करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

धनंजय मुंडे यांचे सध्या प्रकृतीकडे लक्ष

मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या खात्याची जबाबदारी आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा शपथविधी झाला आहे. सध्या भुजबळ हे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत. दरम्यान, दुसरीकडे आरोग्याच्या समस्येतून जात असल्याने धनंजय मुंडे पहिल्यासारखे सक्रिय नाहीत. त्यांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष दिले आहे. मधल्या काळात धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर काही दिवसातच त्यांना बेल्स पाल्सी या दुर्मिळ आजाराने ग्रासले. विविध उपचार घेऊनही अद्याप धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत हवी तितकी सुधारणा झालेली नाही.

विपश्यना करण्याचा निर्णय

वाल्मिक कराडमुळे मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांना विरोधकांनी लक्ष्य केलं होतं. आता मात्र मंत्रिपदावरून दूर झाल्यानंतर त्यांनी मन:शांतीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी इगतपुरी येथील सुप्रसिध्द विपश्यना केंद्रात जाऊन विपश्यना करण्याचा निर्णय घेतला आहे. आठ दिवसांपासून ते त्या ठिकाणी ध्यानधारणा करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.

दोन तारखेपासून पुन्हा कामाला लागणार

सलग दहा दिवस त्यांचा हा कार्यक्रम असल्याचे समजते त्यापैकी आठ दिवस पूर्ण झाले असून ते आपली ध्यानसाधना पूर्ण करून दोन तारखेपासून पुन्हा कामाला लागणार असल्याचे त्यांचे कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी धनंजय मुंडे कुठे आहेत याबद्दल सुगावा लागू दिला नव्हता मात्र ते नाशिक येथे इगतपुरी येथील केंद्रात विपश्यना घेत असल्याचे आता समोर आले आहे. वेगवेगळे वाद, आरोप, शपथविधी राजीनामा अशा वेगवेगळ्या घटनांमुळे धनंजय मुंडे हे मागील सहा महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. मधल्या काळात ते उपचारासाठी विदेशात गेल्याचीही माहिती आली होती.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...