मंत्रिमंडळ विस्तार आणि पंकजांना संधी, धनंजय मुंडेंचं मोठं विधान, म्हणाले…

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 20, 2022 | 11:26 AM

येत्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्रिमंडळ विस्तार आणि पंकजांना संधी, धनंजय मुंडेंचं मोठं विधान, म्हणाले...

पुणे : 2019 ला विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाला. त्यानंतर विधानपरिषदेच्या उमेदवारीतही त्यांना डावलण्यात आलं. त्यानंतर भाजपने त्यांना सक्रीय राजकारणातून दूर केल्याचं बोललं जाऊ लागलं. त्यातच आता येत्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यावर पंकजा यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले…

मंत्रिमंडळ दुसरी यादी जाहीर होणार आहे. पंकजा मुंडे यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे. त्याची पुन्हा काम करण्याची इच्छा आहे का? असं त्यांना विचारायला हवं, असं धनंजय मुंडे म्हणालेत.

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यावरून शिंदे सरकारवर टीका झाली. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात महिला नेत्यांना संधी मिळेल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे येत्या काळात मंत्रिमंडळ विस्तारात महिला नेत्यांना स्थान मिळू शकतं. यात पंकजा मुंडेंची वर्णी लागणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्यावरही धनंजय मुंडे यांनी भाष्य केलंय.

शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली अजून पंचनामे झाले नाहीत. सर्वात जास्त फटका विदर्भ-मराठवाड्याला बसलाय. गेल्या वर्षीही अशी परिस्थिती झाली होती. आम्ही शेतकऱ्यांना मदत केली. पण आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. शिंदे सरकारनेही मदत केली पाहिजे, असं मुंडे म्हणालेत.

सरकार जनतेच्या हितासाठी सत्तेत आलेलं नाही. तर स्वतःच्या हितासाठी आलं आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन राज्य सरकारला केलं आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI