आम्हाला तिघांना ग्रहण लागलं होतं, अजित पवारांनी विश्वास ठेवला, नाहीतर हे आयुष्यभराचं ग्रहण असतं : धनंजय मुंडे

मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांना उद्देशून धनंजय मुंडे बोलत होते.

आम्हाला तिघांना ग्रहण लागलं होतं, अजित पवारांनी विश्वास ठेवला, नाहीतर हे आयुष्यभराचं ग्रहण असतं : धनंजय मुंडे
धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री


पुणे : “इथे तीन असे सूर्य आहेत ज्या सूर्यांना ग्रहण लागलं होतं. पहिला मी, दुसरे आमदार निलेश लंके आणि तिसरे मावळचे आमदार सुरेश शेळके. आम्ही आज जे आहोत ते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमच्यासारख्या तरुणांवर विश्वास ठेवला म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर आहोत. नाहीतर हे आयुष्यभराचं ग्रहण असतं जे कधी निघालंच नसतं. ते अजितदादांनी काढलं. ही खरी गोष्ट आहे”, असं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांना उद्देशून धनंजय मुंडे म्हणाले.

“जाताजाता अजित पवार यांना मी सांगणार आहे. आमदार निलेश लंके तर बोलले. दादा आमच्याही वाढदिवसाला हजेरी लावली… तसं तुमच्या आशीर्वादाने काही कमी नाही. मला याची जाणीव आहे. ही खरी गोष्टी आहे की सुनील अण्णा आणि मी एका पक्षात काम करतो. अण्णा तो इतिहास आहे. तुम्ही-आम्ही एकत्र आहे ते भविष्यात”, असं देखील धनंजय मुंडे म्हणाले.

‘यासारखं वाढदिवसाचं कुठलंच गिफ्ट असूच शकत नाही’

“रोज सूर्य उगवतो आणि मावळतो. पहिल्यांदा मावळामध्ये सूर्य उगवल्यानंतर मावळणार नाही, याची जाणीव होतेय. सुनील शेळकेंनी मला मोठं भाऊ केलंय. तर अजितदादांनी सामाजिक न्यायमंत्री केलंय. वडगाव मावळमध्ये 20 तारखेला सुनील अण्णांच्या तारखेला अजितदादांनी वेळ देणं हे साधंसोपं काम नाही. वाढदिवसाला वेळ देण्यापेक्षा या वडगाव मावळवर आणि सुनील अण्णांवर अजितदादा आणि पवारसाहेबांचं एवढं प्रेम आहे की, दोन वर्षात कितीही आर्थिक संकटं आली तरी वळगाव मावळमध्ये 756 कोटी रुपये विकासकामांसाठी दिले. यासारखं वाढदिवसाचं कुठलंच गिफ्ट असूच शकत नाही”, असं मत धनंजय मुंडेंनी मांडलं.

धनंजय मुंडेंनी लंकेंच्या पक्षप्रवेशाचा किस्सा सांगितला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब आहे. शरद पवार हे या कुटुंबाचे प्रमुख आहे, असंदेखील यावेळी मुंडे म्हणाले. यावेळी मुंडेंनी निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाचा किस्सा सांगितला. “आम्ही हल्लाबोलच्या यात्रेत पारनेरला होतो. अजित पवार येणार निश्चित झालं होतं. निलेश लंके यांचा प्रवेश त्या कार्यक्रमात झाला होता. अजित पवार यांना कब्बडीच्या स्पर्धेच्या कार्यक्रमानिमित्ताने रायगडला जावं लागलं होतं. अजित पवार येणार नाहीत हे निलेश लंकेंना कळालं. पुणे-नगरच्या फाट्यापासूनच लंके पारनेरला यायला तयार नव्हते. अजित पवार असतील तर माझा प्रवेश, नाहीतर काही खरं नाही. आम्ही म्हणालो, आम्ही सगळे आहोत. तर ते म्हणाले, तुमचा उपयोग नाही. शेवटी कसंतरी अजित पवारांशी फोनवर बोलणं करुन दिलं. समाधान झालं. आणि आज लंके आमदार आहेत. मी तर 2014 ला पडलो. पडेल उमेदवाराला शरद पवार आणि अजित पवारांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी बसवलं. हे दुसरीकडे कुठं होत नाही. हे फक्त इथेच होतं आणि ते हेच करु शकतात”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

हेही वाचा :

दुपारी म्हणाले जेवताना आणि झोपतानाच मास्क काढतो, मावळमध्ये अजित पवारांनी काय केलं?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI