मी मुंडे साहेबांचा वारसदार नाही, तो वारसा तुम्हालाच लखलाभ, धनंजय मुंडेंचं पंकजांना उत्तर

वर्धा : निवडणुकीच्या तोंडावर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या बहीण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे नेते आहेत, असा घणाघात पंकजांनी केल्यानंतर धनंजय मुंडेंनीही प्रत्युत्तर दिलंय. विरोधी पक्ष नेता तोडपाणी करणारा असता तर तुमचे घोटाळे बाहेर काढले नसते. शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण […]

मी मुंडे साहेबांचा वारसदार नाही, तो वारसा तुम्हालाच लखलाभ, धनंजय मुंडेंचं पंकजांना उत्तर
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:04 PM

वर्धा : निवडणुकीच्या तोंडावर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या बहीण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे नेते आहेत, असा घणाघात पंकजांनी केल्यानंतर धनंजय मुंडेंनीही प्रत्युत्तर दिलंय. विरोधी पक्ष नेता तोडपाणी करणारा असता तर तुमचे घोटाळे बाहेर काढले नसते. शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की खाल्लेले पैसे दिले तर बरं होईल, असंही त्यांनी म्हटलंय.

धनंजय मुंडे वर्ध्याच्या आघाडीच्या उमेदवार चारुलता टोकस यांच्या प्रचारसभेत आष्टी येथे बोलत होते. पंकजा मुंडेंच्या या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी, मी मुंडे साहेबांचा वारस स्वतःला कधीच समजलं नाही, असं सांगितलं. शिवाय वारसाहक्क पंकजाताईंनीच सांभाळावा, असंही ते म्हणाले.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणलं होतं. पण आत्ताचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकीकडे मंत्र्यांच्या विरोधात लक्षवेधी लावतात आणि दुसरीकडे सेटिंग करतात. तोडपाणी करणारे हे गोपीनाथ मुंडेंचे वारस होऊ शकत नाहीत, असा घणाघात मंत्री पंकजा मुंडे यांनी जिंतूर येथील सभेत केला होता.

विरोधी पक्षनेता तोडपाणी करणारा असता तर तुमच्या सरकारचे घोटाळे बाहेर काढला नसते. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तुम्ही सरकारमध्ये आहात, तेव्हा चौकशी समिती नेमावी. जनाची नाही तर मनाची ठेवावी आणि शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की खाल्लेले पैसे दिले तर बरं होईल. तुम्ही चिक्कीत 200 कोटी खाल्ले. 110 कोटींच्या फोनमध्ये 70 कोटी खाल्ल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें