धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणूक, भाजपच्या अमरीश पटेलांसमोर काँग्रेसच्या अभिजीत पाटलांचे आव्हान

धुळे नंदुरबार विधान परिषदेसाठी भाजपाकडून अमरीश पटेल तर काँग्रेसचे डॉ. अभिजीत पाटील हे रिंगणात आहेत. Abhijit Patil Amrish Patel

  • विशाल ठाकूर, टीव्ही 9 मराठी, धुळे
  • Published On - 12:55 PM, 1 Dec 2020
Abhijit Patil Amrish Patel

धुळे : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसोबत धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. निवडणुकीसाठी भाजपाकडून अमरीश पटेल तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ. अभिजीत पाटील हे रिंगणात आहेत. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. (Dhule Nandurbar mlc constituency Abhijit Patil contest against Amrish Patel)

धुळे-नंदुरबार विधानपरिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांनी काँग्रेस पक्षासह आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. अमरीश पटेल यांच्या विरोधात महाविकासआघाडीने डॉ. अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. धुळे विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठीही शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्रितपणे डॉ.अभिजीत पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे अमरीश पटेलांना आपली जागा टिकवता येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी दोन्ही जिल्ह्यातून मतदारसंघातून 437 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी दहा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात 3 डिसेंबरला मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. (Dhule Nandurbar mlc constituency Abhijit Patil contest against Amrish Patel)

कोरोनामुळं निवडणूक पुढे ढकलली

धुळे नंदुरबार विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मार्चच्या पहिल्या आठवडण्यात पोटनिवडणूक जाहीर केली होती. काँग्रेसला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती धरताना अमरिश पटेल यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. या जागेसाठी 30 मार्चला मतदान होणार होते. पण, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.

विधानपरिषदेच्या धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी शहादा तहसील कार्यालयाच्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्यात महा विकास आघाडीची सत्ता आहे.महाविकासआघाडीच्या सदस्यांची साथ आपल्याला विजयापर्यंत घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमरीश भाई पटेल यांच्यासारख्या दिग्गज उमेदवारांसमोर आपण महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मतदारांच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले. (Dhule Nandurbar mlc constituency Abhijit Patil contest against Amrish Patel)

धुळे जिल्ह्यातील एकूण मतदार

धुळे जिल्हा परिषद 60
धुळे महानगरपालिका 77
दोंडाईचा नगरपालिका 28
शिरपूर नगरपालिका 34
साक्री नगरपंचायत 19
शिंदखेडा नगरपंचायत 19
एकूण 237

नंदुरबार जिल्हातील एकूण मतदार

नंदुरबार जिल्हा परिषद 62
नंदुरबार नगरपालिका 44
नवापूर नगरपालिका 23
शहादा नगरपालिका 31
तळोदा नगरपालिका 21
अक्राणी नगरपंचायत 19
एकूण 200

संख्याबळ

बीजेपी 199
काँग्रेस 157
एनसीपी 36
शिवसेना 22
एमआयएम 9
समाजवादी पार्टी 4
बहुजन समाज पार्टी 1
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 1
अपक्ष 10

संंबंधित बातम्या :

धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणूक जाहीर, भाजपवासी अमरीश पटेल जागा राखणार का?

विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या तिकीटावर काँग्रेसचा माजी आमदार

(Dhule Nandurbar mlc constituency Abhijit Patil contest against Amrish Patel)